मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतल्याबद्दल दानवेंकडून मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन

मुंबई | मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी भाजप सरकारने घेतलेल्या पुढाकाराबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं आहे. 

राज्य मागासवर्गीय आयोगाने आपला अहवाल सरकारला सादर केल्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल, असं ते म्हणाले.

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने राजर्षि शाहू शिष्यवृत्ती जाहीर केली. तसेच विद्यार्थ्यांसाठी होस्टेलची योजना सुरु केली, असं दानवे म्हणाले. 

दरम्यान, व्यवसायात मराठा तरुण स्वतःच्या पायावर उभे रहावेत यासाठी आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जातेय, असंही ते यावेळी म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजप कार्यकर्त्यांचे ‘बुरे दिन’; मंत्र्यानं साफ करुन घेतली चप्पल

-नरेंद्र मोदीच पुन्हा भारताचे पंतप्रधान व्हावेत; नारायण मूर्तींची इच्छा

-अखेर रणवीर-दीपिकाचं ‘शुभमंगल सावधान’; पाहा दोघांच्या लग्नाचे फोटो

-आरक्षण द्यायचंच होतं तर बेचाळीस हुतात्मे जाण्याची वाट का पाहिली?

-माझ्याकडे तुमचा नंबर नाही… हे एेकताच सदाभाऊ खोत तहसिलदारांवर भडकले