राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत रावसाहेब दानवेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
नाशिक | अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळात गरमा-गरमी पाहायला मिळत आहे. नवाब मलिकांवर झालेली कारवाई सुडबुद्धीने केली असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून वारंवार केला जात आहे. तर महाविकास आघाडी सरकार लवकरच पडेल असा पुनरूच्चार भाजप नेत्यांकडून केला जात आहे.
भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी नवाब मलिकांच्या अटकेबद्दल बोलताना महाविकास आघाडी सरकार पडेल असा दावा केला आहे. तर ईडी, सीबीआय ही कारवाई काय फक्त आमच्याच काळात झाली का?, असा सवाल दानवेंनी उपस्थित केला आहे. जर गुन्हेगार नसाल तर सिद्ध करा. तक्रारी येतात म्हणून चौकशी होते, असा टोला दानवेंनी लगावला आहे.
आम्हाला राष्ट्रपती राजवट आणण्याची अजिबात इच्छा नाही. हे अमर, अकबर, अँथनीचे सरकार आहे. पायात पाय अडकून पडतील, असा खोचक टोला रावसाहेब दानवेंनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. ज्यांनी दाऊदची प्रॉपर्टी घेतली त्यांच्यासाठी राष्ट्रवादी आंदोलन करत आहे. याचा अर्थ राष्ट्रवादीचा दाऊद प्रकरणाला पाठिंबा आहे असं समजायचं का?, असा सवालही दानवेंनी उपस्थित केला.
दरम्यान, आता बाळासाहेबांची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेणं अपेक्षित आहे. बाळासाहेबांनी जनतेची बाजू घेतली होती. आता तीच अपेक्षा उद्धव ठाकरेंकडून देखील आहे, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
उदयनराजेंचा हटके अंदाज! हाती घेतलं रिक्षाचं स्टेअरिंग; पाहा व्हिडीओ
महाशिवरात्रीला भांगचा हँगओव्हर झालाय? मग करा ‘हे’ 6 घरगुती उपाय
“प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायचा आणि मते मिळवायची, असं हे भाजपचं राजकारण”
“पंतप्रधानांवर टीका करण्यासाठी तुमची तेवढी लायकी असली पाहजे”
ज्याची भीती होती शेवटी तेच झालं; रशियाने केलेल्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
Comments are closed.