चिल्लर’ लोकांना मी महत्व देत नसतो, या चांडाळ चौकडीला मी पुरून उरेन- रावसाहेब दानवे

जालना | मोदींच्या विरोधात जसे सगळे पक्ष एकत्र आले आहेत, तसंच काही चित्र माझ्या जालन्यात तयार झालं आहे, मात्र मी या चांडाळ चौकटीना पुरून उरेन असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिला आहे.

आमदार बच्चू कडू यांनी नुकतीच जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. 

दरम्यान, जालना मतदारसंघात गेल्या चार वर्षात मी विकासाची कामे केली आहेत, त्यामुळे याची पावती म्हणून मतदार येणाऱ्या निवडणुकीत देखील भाजपच्या पाठीशीच भक्कमपणे उभे राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-… तर भाजपसोबत जाऊ; राजू शेट्टी

-पवारसाहेब, उदयनराजेंना सोडून कोणालाही तिकीट द्या, आम्ही त्याला निवडून आणतो!

-शरद पवार खोटारडे; त्यांच्याशी आपले कधीच संबंध नव्हते!

– राम कदमांसह ‘या’ दोन नेत्यांना भाजप कार्यालय बंदी?

साताऱ्यातील निवडणुकीची बारामतीतून मोर्चेबांधणी; पवारांच्या घरी आमदारांची बैठक

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या