ज्यांच्या हाती सत्तेची चावी, त्यांच्याच कार्यालयात चौथ्यांदा चोरी

जालना : राज्याच्या सत्तेची चावी ज्या भाजपच्या हातात आहे, त्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना चोरट्यांनी लक्ष्य केलं आहे. दानवेंच्या कार्यालयात चौथ्यांदा चोरी झाली आहे. 

दानवे यांचं जालन्यात मोरेश्वर सप्लायर्स नावाचं कार्यालय आहे. हे कार्यालय चोरट्यांनी फोडलं आहे.

तीन चोरट्यांनी वॉचमनच्या गळ्याला चाकू लावला आणि खिडकी फोडून कार्यालयात प्रवेश केला. सीसीटीव्ही फोडून सीडीआरसह 15 हजार रुपयांची रोकड त्यांनी लंपास केली.

पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत दोन जणांना अटक केली आहे. तर तिसऱ्या आरोपीच्या शोधात आहेत. मात्र दानवेंच्याच कार्यालयात चोरी झाल्यानं ही चोरी सध्या परिसरात चर्चेचा विषय आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-“राम मंदिराला विरोध केल्यास सरकार पाडू”

व्यापारी उदानी हत्येप्रकरणी प्रकाश मेहतांचा माजी सचिव अटकेतं

-“त्यावेळी गडकरी एवढंच बोलले… मोदी घरी बोलावून आपला अपमान करतात”

सर्जिकल स्ट्राईकचं नेत्तृत्व करणारे जनरल म्हणतात; “ढिंढोरा पिटून काहीच फायदा होणार नाही”

-विराट कोहलीनं केला विक्रम ; दिग्गज खेळाडूंच्या यादीत समावेश