अजित पवारांच्या दारात पोलीस उभे आहेत, त्यांना कोणत्याही क्षणी अटक होईल!

पिंपरी-चिंचवड | अजित पवारांनी सिंचन घोटाळा केला आहे. त्यांच्या दारात पोलीस उभे आहेत. त्यांना कोणत्याही क्षणी अटक होईल, असं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. 

भाजपकडून निगडी प्राधिकरणच्या मदनलाल धिंग्रा मैदानात अटल संकल्प महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना रावसाहेब दानवेंनी जोरदार फटकेबाजी केली.

२०१४ मध्ये मोदी लाटेवर आम्ही सत्ता काबीज केली, मात्र त्यानंतर केलेल्या विकासकामांमुळे आम्ही सगळ्या निवडणुका जिंकल्या, असं ते म्हणाले. 

दरम्यान, सध्या भाजप नंबर एकचा पक्ष आहे आणि यापुढेही नंबर एकवरच राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-वन खात्याचं नाव बदलून ‘शिकारी खाते’ ठेवा- आदित्य ठाकरे

-काही लोक जेव्हा तोंड उघडतात तेव्हा एके-47 सारखं खोटं बोलतात- नरेंद्र मोदी

-धोनीच्या अनुपस्थितीत रिषभ पंतला स्वतःचा खेळ सिद्ध करण्याची संधी!

-काँग्रेस कार्यकर्त्यांना झालेल्या त्रासाबद्दल माफी नाही- सुजय विखे

-…म्हणून तर नगरसेवक माझ्या नावाने ओरडतात- तुकाराम मुंढे

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या