विरोधक विनाकारण दुष्काळ असल्याचा आरोप करत आहेत- रावसाहेब दानवे

औरंगाबाद | आमच्या सरकारच्या काळात दुष्काळ नाही. विरोधक विनाकारण दुष्काळ असल्याचा आरोप करत आहेत, असा खळबळजनक दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. ब्रम्हगव्हाण उपसासिंचन कार्यक्रमात ते बोलत होते. 

एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ जाहीर करणार असल्याचं सांगितलं असताना दुसरीकडे दानवे यांनी हे वक्तव्य केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दुष्काळ आहे म्हणतील, ते विनाकारण आंदोलन करायला लावतील. मात्र, सरकार या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे, असे दानवे यांनी म्हटले होते.

जर दुष्काळ असेल तर केंद्र सरकारकडे तसा प्रस्ताव पाठवला जाईल, मी सरकार नाही की दुष्काळ जाहीर करेल, असंही ते यावेळी म्हणाले होते. 

महत्त्वाच्या बातम्या-

-राज ठाकरेंच्या व्यंगचित्राच्या तडाख्यात सापडले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

-मोदी सरकारमधील मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप

-धक्कादायक!!! बॉलिवूडमधील सर्वात संस्कारी अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप

-…नाहीतर खोटारड्यांचं ‘राम नाम सत्य’ होणार; शिवसेनेचा भाजपला इशारा

-पाणी पिण्यासंदर्भात आयसीसीचा नवा नियम; विराटच्या तोंडचं पाणी पळालं!

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या