मागचं कापलं, पुढचं कापलं आणि तेवढंच दाखवलं- दानवे

नागपूर | राज्यातील कोणताही नेता शेतकऱ्यांवरील गोळीबाराचं समर्थन करणार नाही. मात्र न्यूज चॅनेलनी मागचं कापलं, पुढचं कापलं आणि तेवढंच दाखवलं, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. ते नागपुरात बोलत होते. 

शेतकऱ्यांच्या छातीवर नव्हे तर पायावर गोळी मारायला हवी होती, असं धक्कादायक वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठं वादळ उठलं होतं, मात्र माध्यमांनी हवं तेवढंच दाखवलं असं दानवे यांचं म्हणणं आहे. 

दरम्यान, दानवेंच्या बुडावर मारण्याची वेळ आलीय, असं म्हणणाऱ्या धनंजय मुंडे यांच्याबद्दल दानवे यांनी काहीही टिपण्णी केली नाही. राजकीय नेते अशाप्रकारची वक्तव्यं करतंच असतात, असं ते म्हणाले.