शिवसेनेसोबत भाजपची युती होणार?; रावसाहेब दानवेंनीही दिले संकेत

बुलडाणा | एकीकडे चंद्रकांत पाटलांनी खासगीत शिवसेनेसोबत युतीची चर्चा सुरु असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी देखील शिवसेनेसोबत युती होईल, असे संकेत दिले आहेत. 

समविचारी पक्षाला सोबत घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे. शिवसेनेने सोबत यावी अशी आमची भूमिका असून ते शेवटी निर्णय घेतील, असं दानवेंनी म्हटलं आहे. 

बुलडाण्याच्या चिखलीत दानवे आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना यासंदर्भात प्रश्न विचारले होते. 

शिवसेना भाजपचा नैसर्गिक मित्रपक्ष आहे. आम्ही गत विधानसभा सोडता 25 वर्षे एकत्र निवडणुका लढवल्या आहेत, असंही दानवे यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-… तर शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवू; भाजपची मोठी घोषणा!

-शिवसेनेसोबत खासगीत युतीची चर्चा; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

-जलयुक्त शिवारचे साडे सात हजार कोटी कुठं गेले?; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

-दुष्काळ सदृश्य, राजा अदृश्य; विखे-पाटलांचा फडणवीसांवर हल्लाबोल

-शिवेंद्रसिंहराजेंवर अन्याय झाल्यास मी सहन करणार नाही- उदयनराजे