उमेदवार भाजपचाच असेल मात्र राणेंवरही अन्याय होणार नाही!

मुंबई | विधान परिषदेसाठी भाजपचाच उमेदवार असेल, असं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलंय. मात्र असं करताना राणेंवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ, असंही त्यांनी म्हटलंय. 

रावसाहेब दानवे यांनी तशी घोषणा केल्यामुळे भाजपच्या शायना एनसी, माधव भांडारी किंवा प्रसाद लाड यांपैकी एकाला उमेदवारी मिळू शकते. राणेंना मात्र प्रतिक्षा करावी लागणार असं दिसतंय. 

दरम्यान, राणेंवर अन्याय होऊ देणार नाही, असं दानवेंनी सांगितलंय. त्यामुळे भाजपने नारायण राणेंना चांगलं आश्वासन दिलं असावं, असं मानलं जातंय. राणेंना भाजप कसा न्याय देणार हे मात्र येणारा काळच सांगू शकतो.