Top News जालना महाराष्ट्र

‘शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात’; दावनेंचा अजब दावा

जालना | गेले 14 दिवस दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरोधात आंदोलन चालू ठेवलं आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन पेटतच चाललं आहे. अशातच भाजप नेते आणि  केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनाबाबत अजब दावा केला आहे.

दिल्लीतील आंदोलन शेतकऱ्याचं नाही. या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा अजब दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. जालनामध्ये  कोलते टाकली येथे ते बोलत होते.

या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लिम समाजाला उचकवलं आणि सांगितलं सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावं लागेल. मात्र एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का?, असा सवाल दानवेंनी यावेळी बोलताना केला.

दरम्यान, शेतकऱ्यांना सरकार तुम्हाला तोट्यात घालत असल्याचं बाहेरचे देश सांगत आहेत. त्यामुळए आपल्या शेतकऱ्यांनी याच विचार करायला पाहिजे. हे आंदोलन सुटा बुटातल्या लोकांचे असून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे असल्याचं दावने म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“योगी आदित्यनाथ यांनी फिल्म सिटी उभारण्याबाबत दूरदृष्टी दाखवली, प्रकल्पात सहभागी व्हायला मला आवडेल”

शरद पवारांच्या नावाने ठाकरे सरकार लागू करणार ‘ही’ योजना!

एक दिवस ही ‘ईडी’च भाजपला संपवल्याशिवाय राहणार नाही- धनंजय मुंडे

ठाकरे सरकारला धक्का! मराठा आरक्षणावरील तात्काळ स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

“देवेंद्र फडणवीसांसोबत माझं भांडण तरीही मी भाजपसोबत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या