पुणे महाराष्ट्र

“खरं तर सत्तारांचे केसच उगवू देणार नव्हतो, पण आता टोपी निघू देणार नाही”

पुणे | सत्तार यांनी आधी मला पाडल्याशिवाय डोक्यावरील केसं वाढवू देणार नाही, असं म्हटलं होतं. त्यामुळे मी त्यांचे खरं तर केसच उगवू देणार नव्हतो, असा टोला भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांना लगावला आहे.

अब्दुल सत्तार यांचं पहिलं वक्तव्य रावसाहेब दानवेंना पाडल्याशिवाय डोक्यावर केस उगवू देणार नाही असं होतं. तरीही दानवे निवडून आले. त्यानंतर आता त्यांनी पण केला की दानवेंना पाडल्याशिवाय टोपी घालणार नाही, असं दानवे म्हणाले. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

अब्दुल सत्तार माझे चांगले मित्र आहेत. बिचारे ते इतकं बोलतात, पण निवडणूक आली की माझंच काम करतात. त्यांच्या तालुक्यात माझी आणि माझ्या तालुक्यात त्यांची सासुरवाडी आहे. पण मी त्यांची टोपी कधीच निघू देणार नाही. चिंता करू नका, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय.

दरम्यान, सरकारकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. यामुद्द्यांवरून दानवेंनी सरकारवर टीका केलीये. आमच्या सगळ्यांच्या सुरक्षा हटवल्या, तरी आम्ही त्याबद्दल सरकारकडे दाद मागणार नाही. आमचं संरक्षण केवळ पोलीस करतो असं नाही. आमचं संरक्षण या राज्यातली जनता करते. त्यामुळे सुरक्षा हटवली, तर आमच्या कामात कमीपणा येईल किंवा आम्ही हादरून जाऊ असं होणार नाही, असं दानवे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

‘थोडं राजकारण कमी करा आणि…’; भंडाऱ्यातील दुर्घटनेनंतर सामनातून राऊतांचा केंद्राला सल्ला

धक्कादायक! परराज्यातून आलेल्या तरुणीवर औरंगाबादेत सामूहिक बलात्कार

…नाहीतर त्यांच्या पेकाटात लाथ घातली पाहीजे- आशिष शेलार

“ये पब्लिक सब जाणती है, सुरक्षा कमी करणं हा सरकारचा खुजेपणा”

‘सुरक्षा काढण्याची परंपरा भाजपचीच’; अब्दुल सत्तारांचं भाजप नेत्यांना प्रत्युत्तर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या