बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेनेत दोनच माणसं शिल्लक राहणार आहेत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे”

मुंबई | रेल्वे राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. शिवसेनेत दोनच माणसं शिल्लक राहणार आहेत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, असा सणसणीत टोला रेल्वे राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी लगावला.

येणाऱ्या काळात सर्व निवडणुका आम्ही जिंकू, असा विश्वासही दानवेंनी व्यक्त केला. जी राहिली आहे, ती शिवसेना फुटू देऊ नका, असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक-एक माणूस वेचून एवढी मोठी शिवसेना उभी केली, त्या शिवसेनेचे तुकडे करण्यात संजय राऊतांचा मोठा सहभाग आहे. आता तरी सांभाळा, वाक्य जपून वापरा, असा सल्ला दानवेंनी राऊतांना दिला आहे.

दरम्यान, पुढील नगरपालिका, पंचायत समित्या, महापालिका निवडणुका आम्हीच जिंकू. गेल्या वेळी 92 पैकी 82 नगरपालिका एकट्या भाजपने जिंकल्या होत्या. त्यावेळी तर युतीही नव्हती, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आमच्या सोबत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

अमरनाथ घटनेवर अक्षय कुमारने व्यक्त केलं दुःख, म्हणाला…

खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी एकमेकींना धुतलं, हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल

शिंदे गटाच्या ‘या’ भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती!

गौतम अदानी मुकेश अंबानींच्या जिओला देणार टक्कर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More