बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ज्यांच्याकडे 40 आमदार त्यांचाच दसरा मेळावा शिवाजी पार्कात व्हावा”

नवी दिल्ली | शिवसेनेचा दसरा (Shiv sena Dussehra Melawa) मेळावा कुठे होणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. अशातच शिंदे गटानेही आपण दसरा मेळावा घेण्यावर ठाम असल्याचं म्हटलंय. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी नेमकं शिवाजी पार्क कुणाला मिळतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

ज्यांच्याबरोबर 40 आमदार त्यांचाच दसरा मेळावा शिवाजी पार्कवर व्हावा, असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरेंनी आम्हाला धोका दिला. इतकंच नाही तर त्यांनी जनतेलाही धोका दिला. अमित शाह यांनी कोणताही शब्द दिला नव्हता. निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानं शिवसेनेनं मतं मागितली. नंतर आम्हाला धोका दिला, असं म्हणत दानवे म्हणालेत.

बारामतीची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर दिलीय. माझ्यावर पण जबाबदारी दिली आहे. आम्हाला विश्वास आहे की बारामतीही भाजपचा उमेदवार विजयी होईल, असं दानवे म्हणालेत.

‘तू ठाकरे है तो मै राणा हूँ, देखते है…’; नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना इशारा

शिंदेंनी उद्धव ठाकरेंचं टेंशन वाढवलं; दसरा मेळाव्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More