रावसाहेब दानवेंकडून महाविकास आघाडीला अमर, अकबर, अँथनीची उपमा, म्हणाले…
मुंबई | महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष पेटला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई, भोंग्यांचा विषय यावरून भाजप नेते शिवसेनेला घेरलं आहे. अशातच आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
गीता शिकवण्याऐवजी शिवसेना आता नमाजचे वर्ग घेत आहे. शिवसेना आता अकबर झाली आहे. परिणामी त्यांनी नमाजचे वर्ग घ्यावेत, असंही दानवे म्हणाले आहेत. ठाकरे सरकार हे अमर, अकबर, अँथनी सरकार आहे, राज्याच्या हिताच्या प्रश्नावर एकत्र बसत नाही, अशी टीका दानवेंनी केली आहे.
राज्यात कोळशाचे नियोजन या सरकारनं नीट केलंं नसल्यानं राज्याला अभुतपुर्व वीज टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता असल्याचं देखील दानवे म्हणाले आहेत. अमर, अकबर, अॅंथनीमध्ये शिवसेना कधीच अकबर झाली आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.
दरम्यान, राज ठाकरेंनी महाविकास आघाडीला भोंग्यांच्या प्रश्वावर घेरल्यानंतर आता दानवेंनी देखील महाविकास आघाडीवर नमाज पठणावरून टीका केली आहे.
थोडक्यात बातम्या –
बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळाची RSSला अडचण; वाद पेटण्याची शक्यता
महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आयसीयू सेंटरचे भूमिपूजन संपन्न
नवाब मलिकांना मोठा दणका! तब्बल आठ मालमत्तांवर ईडीची टाच
“राज यांचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्र, ते कोणाचे…”, चंद्रकांत पाटलांकडून राज ठाकरेंचं तोंडभरून कौतूक
राज ठाकरेंच्या टीकेला शरद पवारांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले…
Comments are closed.