महाराष्ट्र मुंबई

‘…तर एकनाथ खडसे मुख्यमंत्री झाले असते’; रावसाहेब दानवेंचं मोठं वक्तव्य

मुंबई | एकनाथ खडसेंना प्रदेशाध्यक्ष पद देऊनही त्यांनी नाकारलं, त्यामुळे देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष झाले. जर एकनाथ खडसे प्रदेशाध्यक्ष असते तर कदाचित खडसे मुख्यमंत्री असते, असं केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे.

खडसेंना प्रदेशाध्यक्षपदापेक्षा मंत्रिपदात जास्त रस होता. परिस्थिती सुधारणार नाही असं वाटत असल्याने खडसेंनी राजीनामा दिला असावा. नाथाभाऊ आमचे नेते होते, त्यांनी पक्ष सोडला दु:ख आहे. पण पक्ष एका माणसावर आधारित नसतो, असंही दानवे म्हणालेत.

एकनाथ खडसेंच्या जाण्याने काहीही फरक पडणार नाही, पण राष्ट्रवादीने नाथाभाऊंचा उपयोग राज्याच्या भल्यासाठी करावा, विरोधकांसाठी नव्हे, असा टोला रावसाहेब दानवे लगावलाय.

नाथाभाऊसोबत एकही आमदार, पदाधिकारी जाणार नाही याची खात्री आहे. कारण ते विचारधारेशी जोडलेले आहे. उत्तर महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे. म्हणून चिंता नाही, एकनाथ खडसे आता भाजपासाठी विषय संपलेला आहे, असंही दानवे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

दिलासादायक! भारत बायोटेकची लस तिसऱ्या टप्प्यात, लवकच चाचणीला होणार सुरुवात

“वादा तेरा वादा” म्हणत ‘या’ दिग्दर्शकाने मोदी सरकारची उडवली खिल्ली

एकनाथ खडसेंसोबत पुण्यातील ‘हा’ प्रसिद्ध व्यक्तीही करणार राष्ट्रवादीत प्रवेश

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरु

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या