“विधानसभेसाठी पक्षातील भरती बंद”

औरंगाबाद | विधानसभेसाठी पक्षातील भरती बंद केली असून जुन्यांनाच संधी देणार आहे, असं सांगत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पक्षातील ‘इनकमिंग’बाबत भूमिका स्पष्ट केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामावर खूष होऊनच विखे पाटलांनी पक्षात प्रवेश केला. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी चांगल्या माणसांना घ्यावं लागतं, असं दानवेंनी म्हटलं आहे. ते औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

लष्कर भरतीसारखीच पक्षातही भरती सुरूच ठेवावी लागते. मात्र विधानसभेसाठी भरती बंद केली असल्याचं दानवेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, सिनेमासारखं राजकारणातही माणसं भूमिका बदलत असतात. जसा रोल मिळाला तसं बोलतात, असंही दानवे म्हणाले आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

या नेत्याला मुख्यमंत्री करा तरच राजीनामे परत घेऊ; काॅंग्रेसच्या आमदारांची मागणी

-कारखानदारीबाबत शरद पवारांची मोठी भविष्यवाणी

-11 काँग्रेस आमदारांनी राजीनामा परत घ्यावा यासाठी मुंबईत कार्यकर्त्यांचं आंदोलन

-“मला कुणी विचारलं साखर कारखानदारी करू का तर मी म्हणतो…”

-राहुल गांधींच्या ‘या’ जवळच्या नेत्याने दिला पदाचा राजीनामा

Loading...