जालन्यात रावसाहेब दानवेंचा कस लागणार; औताडे मुसंडी मारण्याची शक्यता

जालना | जालना लोकसभा मतदारसंघात एकतर्फी वाटणारी निवडणूक आता चांगलीच रंगतदार होणार असल्याचं दिसतंय. घरच्या मैदानावरच रावसाहेब दानवे यांचा कस लागण्याची शक्यता आहे.

दानवे भाजपचे स्टार प्रचारक आहेत, मात्र आजारी पडल्यामुळे ते सध्या आराम करत आहेत. त्यामुळे प्रचारात दानवे कमी पडत असल्याचं चित्र आहे.

दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांनी कमी कालावधीत जोरदार प्रचार सुरु केला आहे. रावसाहेब दानवेंची पडती बाजू ते सध्या अतिशय प्रभावीपणे मतदारांसमोर मांडत आहेत. त्यामुळे त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र आहे.

एकीकडे आजारपण आणि दुसरीकडे प्रचारात आलेला ढिलेपणा यामुळे दानवे चिंताग्रस्त आहेत. आजारी असले तरी लवकरात लवकर प्रचारात सक्रीय होण्याची त्यांची धडपड असल्याचं कळतंय.

महत्त्वाच्या बातम्या

-भाजपलाच मतदान करा, मोदींनी कॅमेरे लावले आहेत; भाजप आमदाराची धमकी

ज्यांना गरिबी हटवायला जमली नाही ते विकास काय करणार; बापटांचा काँग्रेसवर घणाघात

-2019 माझी शेवटची निवडणूक; भरघोस मतांनी मला विजयी करा- सुशीलकुमार शिंदे

-सरकारमध्ये हिम्मत असेल तर राज ठाकरेंच्या घरी छापा मारून दाखवा- नवाब मलिक

-‘एक हसतमुख आणि दुसरे देशमुख’… दोघांनी महाराष्ट्राची वाट लावली- नितीन गडकरी