बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जिवा शिवाची बैल जोड़! रावसाहेब दानवेंचा पत्नी आणि नातीसह बैलगाडीतून फेरफटका

जालना | ग्रामीण भागातील राजकारणाची उत्तम जाण असणारे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) महाराष्ट्रातील सदाबहार व्यक्तिमहत्त्व आहेत. नुकताच रावसाहेब दानवे यांचा रस्त्यावर जेवण करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. त्यांचा हा साधा स्वभाव अनेकांना आवडला होता. अशातच रावसाहेब दानवे यांचा आणखी एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. (Raosaheb Danve’s tour in a bullock cart with wife)

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नळणी या गावी सध्या रावसाहेब दानवे आहेत. गावी पोहचल्यावर दानवे यांनी आपल्या शेतात फेरफटका मारला. त्यावेळी त्यांच्या सौभाग्यवती आणि दानवेंची नात देखील सोबत होती. विशेष म्हणजे त्यांनी हा शेतातील फेरफटका बैलगाडीवर मारला आहे. यावेळी स्वत: दानवेंनी बैलगाडी चालवली.

रावसाहेब दानवे यांनी त्यांचा फोटो ट्विटरवर आणि फेसबूकवर शेअर केला आहे. आयुष्याच्या प्रवासात भक्कम साथ देणाऱ्या सहधर्मचारिणी व त्याचबरोबर माझ्या नाती सोबत गावी असताना बैलगाडीवरून शिवारात फेरफटका मारला, असं दानवे या पोस्टमध्ये म्हटले आहेत.

दरम्यान, ‘जिवा शिवाची बैल जोड़… लाविल पैजंला आपली कुडं’, अशी गाण्याची ओळ देखील त्यांनी लिहिली आहे. ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रीय मंत्री असा रावसाहेब दानवे यांचा प्रवास आहे. त्यामुळे त्यांची गावासोबतची नाळ अद्याप कायम असल्याचं दिसून येतं.

पाहा पोस्ट-


थोडक्यात बातम्या-

‘हा’ बहुप्रतिक्षित IPO शेअर बाजारात धडकणार; गुंणतवणूकदांरांंना मोठी संधी

इकडं सुनेची ईडीकडून चौकशी तर संसदेत सासू भाजपवर कडाडल्या

कुत्री-माकडांचं टोळीयुद्ध संपलं! दहशत माजवणारी माकडं अखेर जेरबंद

“माझा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, मी ‘त्या’ नेत्यांसारखा नाही जे…”

“स्वत:ला मोठा नेता म्हणे, तुम्ही सव्वाशेर नाही आता पावशेर झालात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More