‘ …तर आम्ही मदत करू शकतो’; न्यायालयानं बलात्काऱ्याला विचारलेल्या प्रश्नानं सगळेच हैराण!
नवी दिल्ली | बलात्काराच्या आरोपीला सर्वोच्च न्यायालयाने एक असा प्रश्न केला की, त्याने होकार दिल्यास त्याची थेट न्यायालय मदत करेल असं सांगण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयात एका बलात्काराच्या सुनावणी दरम्यान न्यायाधिशांनी संबंधित आरोपीला पिडीतेशी लग्न करण्याचा प्रस्ताव त्याच्यापुढे ठेवला आहे. आरोपी मोहीत सुभाष चव्हाण हा महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रिक प्रोडक्शन कंपनीमध्ये टेक्निशियन पदावर कार्यरत आहे.
मोहीतवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने त्याला मुलीशी लग्न करणार का? असा प्रश्न केला आहे. आरोपी मोहीतने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल झाली आणि मुलीच्या आईने प्रकरण मिटवण्यासाठी मोहीतला पिडीतेशी ती 18 वर्षाची झाल्यानंतर लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, तेव्हा मोहीतने तो स्विकारला.
मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर मोहीतने लग्नास नकार दिल्याने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. मोहीत सरकारी कर्मचारी असल्याने त्याची नोकरी जाऊ नये आणि मुलीच्या भविष्याचा विचार करता न्यायालयाने परत एकदा त्याला लग्न करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. लग्न केलं नाही तर कायदेशिर कारवाई होऊन तुझी नोकरी जाईल असंही यावेळी न्यायाधिश बोबडे यांनी सांगितलं. यावर मोहीतच्या वकिलांनी चर्चा करून निर्णय घेऊ असं सांगितलं आहे.
न्यायालयाने आरोपीच्या वकिलांना सांगितलं की, त्याने न्यायालयाचं ऐकलं तर त्याला आम्ही मदत करू शकतो. अन्यथा नोकरी गमावुन त्याला तुरूंगात जावं लागेल. आम्ही त्यासाठी 4 आठवड्यांचं अटकेपासुन संरक्षण देऊ शकतो. त्यावर आता मोहीत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाणांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी!
आयआयटी प्रोफेसर असल्याची बतावणी करून व्यापाऱ्यांना घातला ‘इतक्या’ लाखांना गंडा
“मोदींना आणि योगींना मुलं नाहीत ते काय कुणाला देऊन जातील”
मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या मंत्र्याच्या मुलाला झाली कोरोनाची लागण
अजित पवार कुठल्या राजकीय बुद्धीने काम करत आहेत कळत नाही- पंकजा मुंडे
Comments are closed.