Rohit Tilak  - टिळकांचे खापर पणतू रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा
- पुणे, महाराष्ट्र

टिळकांचे खापर पणतू रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा

पुणे | लोकमान्य टिळकांचे खापर पणतू आणि काँग्रेस नेते रोहित टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. लग्नाचं अमिष दाखवून रोहित यांनी वेळोवेळी आपल्यावर बलात्कार केल्याचं तक्रारदार महिलेनं म्हटलं आहे.

तक्रारदार महिला वकील असून गेल्या काही दिवसांपासून आपल्या पतीपासून वेगळ्या राहात आहेत. त्यांनी २०१५ मध्ये रोहित यांच्याशी ओळख झाली होती.

२०१५ ते २०१७ या कालावधीत केसरीवाडा तसेच पुण्यातील विविध हॉटेल्समध्ये रोहित यांनी आपल्यावर अत्याचार केल्याचं या महिलेनं म्हटलंय.

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा