बलात्कार पीडितेला मदत करण्याऐवजी पोलिसानं केला गर्भपात

लातूर | बलात्कार पीडितेला मदत करण्याऐवजी पोलीस अधिकाऱ्यानं तिला गर्भपात करायला भाग पाडलं. लातूरच्या देवणी तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडलाय. 

ऊसतोडणी कामगाराच्या मुलीला मुकादमानं फूस लावून पळवून नेलं. त्यानंतर ती गर्भवती राहिली. याप्रकरणी तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर पोलीस अधिकारी कृष्णदेव पाटील यांनी तिच्यावर दबाव आणून तिला गर्भपात करण्यास भाग पाडलं. तसेच तिच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांचं अमिषही दाखवलं.

दरम्यान, पीडित मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने लातूर पोलिसांची अब्रू धुळीस मिळाली. त्यामुळे कृष्णदेव पाटील यांची बदली करण्यात आलीय. मात्र आरोपी अद्याप मोकाटच आहेत.