बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अवघ्या 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, अमरावतीत चार दिवसात दुसरा प्रकार

अमरावती | गेल्या काही दिवसांपासून महिला सुरक्षेचा मुद्दा राज्यात पुन्हा ऐरणीवर आला आहे. राजधानी मुंबईमध्ये घडलेल्या साकीनाका प्रकरणानं राज्य सरकारला टीकेला सामोरं जाव लागतंय. त्यातच आता अमरावतीत घडलेल्या दोन घटनांमुळे संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे.

अमरावती तालुक्यातील वनोजा गावात राहत असलेल्या एका 7 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 11 सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे मुलीचे आई-वडील पोटापाण्यासाठी दुसऱ्यांच्या शेतावर मजूर म्हणून काम करण्यासाठी गेले. आपल्या पोटच्या मुलीला आजी आजोबांकडे सोडलं. पण पिडीत मुलगी शौचालयासाठी गेली असताना मुलीला शेतात जाऊ म्हणत तरूणाने पिडीतेला दुचाकीवरून लांब शेतात नेलं.

शेतात कोण नसल्याचं बघून त्याने लहान मुलीवर अत्याचार केले. आई वडील घरी आल्यानंतर मुलगी रडताना दिसली. त्यावेळी मुलीला विचारणा केल्यानंतर मुलीने झालेली घटना आई वडिलांना सांगितली. त्यानंतर आई वडिलांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलीसांना झालेला घटना सांगितली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हे दाखल केले आणि गुन्हेगारांना अटक केली आहे.

दरम्यान, त्याआधी दोन दिवसांपूर्वीच अमरावतीत 17 वर्षाच्या एका मुलीवर बलात्कार झालेल्या घटना घडली होती. त्यावेळी मुलीला गर्भधारणा झाली. त्यामुळे तिने आपलं जीवन संपवलं होतं. शहरात झालेल्या या दोन घटनेने अमरावती शहरचं हादरल्याचं चित्र निर्माण झालंय.

थोडक्यात बातम्या-

पावसाचं रौद्ररूप! कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री; भाजपच्या बैठकीत मोठा निर्णय

‘शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं’; बाळासाहेब थोरातांचं पवारांना आवाहन

राजस्थानची चिंता मिटली! आयपीएलआधी ‘या’ नव्या खेळाडूची तुफान खेळी

‘महिलांच्याबाबतीत सरकार असंवेदनशील’; राष्ट्रीय महिला आयोगाने ठाकरे सरकारला फटकारलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More