भोपाळ | मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे एका तरुणीवर चालत्या कारमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणी कुलैथ येथे राहणारी असून तिला नोकरीची ऑफर देऊन गाडीत बसवून नेण्यात आलं होतं. याचदरम्यान चालत्या कारमध्येच तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तीने एका व्यक्तीवर केली आहे.
आरोपी व्यक्तीचं नाव रामबाबू गुर्जर असून तो मुरैना येथे राहणारा आहे. त्याने तरुणीला नोकरीची संधी देण्याचा बहाणा सांगून बहोडापूर येथे गाडीत बसवलं. याचदरम्यान चालत्या गाडीतच तिच्यावर बलात्कार केला.
धक्कादायक बाब म्हणजे आपल्यावर बलात्कार होत असताना आरोपीचा कार चालक गाडी चालवत होता. त्याने या प्रकारात आरोपीला साथ दिल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. तिच्या या आरोपांमुळे या भागात एकच खळबळ उडाली आहे.
आरोपीच्या तावडीतून आपली कशीबशी सुटका करुन महिलेने इंदरगंज पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपी रामबाबू आणि कारचालकाला अटक केली आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक विजय भदौरिया यांनी याबाबत माहिती दिली आहे.
थोडक्यात बातम्या-
मृतदेह घेऊन रुग्णालयात पोहोचली महिला, खरा प्रकार पाहून पोलीसही चक्रावले
वारकरी बाहेर पडले तर सरकारच्या अंगलट येईल, ‘या’ महाराजांनी दिला इशारा
मी वाईट माणूस नाहीये रे…. अभिनेत्रीच्या आरोपावर दिग्दर्शकाचं भावनिक स्पष्टीकरण
संजय राठोड शक्तिप्रदर्शन करणार?, इतक्या हजार लोकांची गर्दी होण्याची शक्यता
पूजा चव्हाण प्रकरणात नवा मेसेज व्हायरल, संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता