नवी दिल्ली | मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होत असल्याचं धक्कादायक वक्तव्य उत्तर प्रदेशच्या बलिया विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी केलं आहे.
उत्तर प्रदेशमध्ये रामराज्याचा दावा केला जात असताना बलात्कारासारख्या घटना समोर येत आहेत. यामागचं कारण काय? असा प्रश्न सिंह यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
आपल्या मुलींना संस्कारीत वातावरणात राहण्याच्या, चालण्याच्या आणि एक शालीन व्यवहार दर्शवण्याच्या पद्धती शिकवणं हा आई-वडिलांचा धर्म आहे. अशा घटना चांगल्या संस्कारांनीच थांबवल्या जाऊ शकतात, असं सुरेंद्र सिंह म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या-
बीडच्या तरुणाची सुसाईड नोट खोटी, अज्ञाताविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
‘महाराष्ट्रात उद्योगासाठी पुढे या’; शरद पवारांचं अनिवासी भारतीयांना आवाहन
‘हाथरस प्रकरण एक छोटासा मुद्दा’; उत्तर प्रदेशातील मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य
“त्या सर्वांनी तोंड न लपवता महाराष्ट्र पोलिसांची जाहीर माफी मागावी”