ओळखीचा फायदा घेतला; कॉफीत नशेचे पेय टाकून केला बलात्कार

ओळखीचा फायदा घेतला; कॉफीत नशेचे पेय टाकून केला बलात्कार

मुबंई | काॅफीमध्ये नशेचे पेय टाकून तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच तरुणीचे अश्लील फोटो आपल्या मित्रांना पाठवल्याची संतापजनक घटना बलात्कार करणाऱ्याने केली आहे.

याप्रकरणी चारकोप पोलिसांनी संतोष सिंग या तरुणाला अटक केली अाहे. मालाड पश्चिम येथे राहणारा संतोष चित्रपट क्षेत्राशी संबंधीत छोटी कंत्राटे घेतो.

22 वर्षीय तरुणीला नोकरीची गरज असल्याने तिला तिच्या मित्राने संतोषची ओळख करुन दिली. संतोषने तरुणीला एका ठिकाणी कामाला लावले. काही दिवसांनी संतोषने तिला आपल्या घरी बोलावले. तिला काॅफीमध्ये नशेचे पेय टाकून बेशुद्ध केले व तिच्यावर बलात्कार केला.

दरम्यान, तरुणीला हा प्रकार लक्षात येताच तिने मित्राच्या मदतीने चारकोप पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत संतोषला अटक केली आहे.  

महत्त्वाच्या बातम्या-

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात आणखी एका महिलेचा मृत्यू

-पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा कपात; पहा आजचे दर

-आठवडा उलटला; अवनीच्या त्या 2 बछड्यांचं नेमकं काय झालं?

-अवनी वाघिणीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन

-‘आणि… घाणेकर’साठी मनसे आक्रमक; खळ्ळ खटॅकचा इशारा

Google+ Linkedin