बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला बलात्काराची धमकी, आरोपी गजाआड

मुंबई | मराठी अभिनेत्रीला दिपाली सय्यदला गेल्या वर्षभरापासून खून आणि बलात्काराची धमकी मिळत होती. अखेर या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. गेली एक वर्षे हा आरोपी दिपालीला फोनवरून धमकावत होता.

2019 मध्ये नगरमध्ये दिपालीने पाणी प्रश्नावरून आंदोलन छेडलं होतं. तेव्हा संदीप वाघ याने दिपाली यांचा फोन नंबर मिळवला. आणि त्यानंतर तिला धमकीचे फोन करण्यास सुरुवात केली.

सतत फोन करत असल्याने दिपालीने संदीपचा नंबर ब्लॉक केला. त्यानंतर त्याने दुसऱ्या फोनवरून फोन करण्यास सुरुवात केली. या सर्व गोष्टीबाबत दिपालीने तिच्या भावाला कल्पना दिला.

अखेर दिपालीने पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी संदीप वाघ याला नगर जिल्ह्यातून अटक केलीये. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘…त्यात ‘डिसलाइक’ करण्यासारखं काहीच नव्हतं’; भाषणानंतर शिवसेनेचा मोदींना टोला

आजची मंत्रिमंडळाची बैठक रद्द, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कधी मिळणार मदत?

…म्हणून सीबीआयला राज्यात ‘नो एन्ट्री’- किरीट सोमय्या

दिलासादायक! सलग तिसऱ्या दिवशी देशभरात 60 हजारांहून कमी रूग्णांची नोंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More