बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राफेल व्यवहाराची फ्रान्समध्ये चौकशी होऊ शकते तर भारतात का नाही”

मुंबई | राफेलबाबत फ्रान्समध्ये मोठी घडामोड घडली आहे. या गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी भारतात लोकसभेच्या निवडणुकांच्यावेळी हा मुद्दा चर्चेत आला होता मात्र त्यानंतर गायब झाला परंतू फ्रान्समध्ये राफेलची फाईल पुन्हा उघडण्यात आली आहे. यावरून काँग्रेसचे माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

राफेल फायटर जेटच्या व्यवहारात गौडबंगाल असून या व्यवहारात करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने उघड केलं. या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणीही केली परंतु मोदी सरकारने या व्यवहाराची चौकशी न करता प्रकरण गुंडाळले. मात्र सत्य जास्त दिवस लपत नसतं आज फ्रान्समध्ये राफेल व्यवहाराची चौकशी सुरु झाली असून, मग भारतातच राफेल व्यवहाराची चौकशी का केली जात नाही? असा सवाल बाळासाहेब थोरातांनी केला आहे.

युपीए सरकारच्या काळातच 126राफेल फायटर जेट विमाने प्रत्येकी 556 कोटी रुपयांनी खरेदी करण्याचे निश्चित झाले होते परंतु त्यानंतर आलेल्या मोदी सरकारने याच फायटर जेटसाठी भरमसाठ असे 1670 कोटी रुपये देऊन व्यवहार केला. हा व्यवहार करताना अनेक बाबींना फाटा देण्यात आल्याचा आरोप थोरातांनी केला आहे.

दरम्यान, राफेल विमान खरेदीवरून मोदी सरकारवर विरोधी पक्षांनी टीका करण्यास सुरूवात केली आहे.  फ्रान्समध्ये राफेल व्यवहाराच्या चौकशीमध्ये काय समोर येतं हे  पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

“सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही, चळवळ चांगली केली तर प्रश्नांना यश येतं”

लवकरंंच राज्यात मोठा राजकीय भूकंप येणार? शेलार-राऊत भेटीने चर्चांना उधाण

पुणे कोरोनामुक्तीकडे! कोरोनाच्या घटत्या रूग्णसंख्येमुळे पुण्यातील ‘हे’ जम्बो कोव्हिड सेंटर बंद

पोलीस विभागाबाबत महत्त्वाची बातमी! ‘पोलीस शिपाईही होणार पीएसआय’, गृहमंत्री वळसे-पाटलांचा प्रस्ताव

“राज्य सरकार वारकऱ्यांना देखील सोडत नाही, त्यांचीही मुस्कटदाबी करत आहे”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More