बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मेंदूवर परिणाम करणारा दुर्मिळ कोरोना; ‘या’ राज्यात सापडला पहिला रूग्ण

बंगळुरू | कोरोनाने मागील दोन वर्षात जगभरात थैमान घातलं होतं. सध्या कोरोनाची स्थिती काहीशी सुधारत असली तरी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे पुन्हा चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे सरकार काळजीत आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कडक निर्बंध देखील लावण्यात आले आहेत.

कर्नाटक राज्यातील एका गावातल्या 13 वर्षाच्या मुलाला दुर्मिळ कोरोना झाल्याचं आढळून आला आहे. 13 वर्षाच्या मुलामध्ये मेंदूवर परिणाम करणारा असा दुर्मिळ कोरोना व्हायरस आढळून आला आहे. कर्नाटक राज्यात घडणारी ही पहिली घटना आहे. रविवारी एस एस इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज अँड रिसर्च सेंटरनं या संदर्भातली माहिती दिली आहे.

बाधित मुलगा नुकताच कोरोनामुक्त झाला होता आणि त्यानंतर तो एएनईसी बाधित झाला. आतापर्यंत अशी परिस्थिती होती की कोरोनानंतर मुलांना फक्त मल्टीसिस्टम इन्फलॅमेटरी सिंड्रोमचा सामना करावा लागत होता. मात्र आता आपल्याला एएनईसीकडेही लक्ष द्यावं लागेल, असं डॉ. एन के कलप्पनवार यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राज्यात अशा दुर्मिळ कोरोनाचं पहिलं प्रकरण समोर आलं आहे. मुलाच्या शरीरात अँटीजेन्सचे उच्च प्रमाण आढळलं. ज्यामुळे त्याला कोरोनाची लागण झाल्याचं समजत आहे. मुलाची प्रकृती आता ठिक होत आहे. या रोगाचा वेळेवर उपचार केला नाही तर ते प्राणघातक ठरू शकते, असंही डॉ. एन के कलप्पनवार यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

बंदी असतानाही फिरायला जाणं पडलं महागात; लोणावळ्यात 900 पर्यटकांकडून ‘इतक्या’ लाखांचा दंड वसूल

“सर्वकाही सुरळीत आणि मनाप्रमाणे होईल, पण देवेंद्र फडणवीस संन्यास घेऊ नका”

“आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही संजय राऊतांची सवय”

महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात तणावाचं वातावरण; शिवसैनिक-कर्नाटक पोलीस आमने सामने

“भाजपचे नेतेच ओबीसी आरक्षणाचे खरे मारेकरी, भाजपचं हे ढोंगी राजकारण”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More