बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

अहमदनगर | राज्‍य सरकारने विविध क्षेत्रातील अनुभव संपन्‍न लोकांचा समावेश असलेली सर्वपक्षीय उच्‍चाधिकार समिती स्‍थापन करुन राज्‍याच्‍या हितासाठी सकारात्‍मक पाऊल टाकावं, अशी मागणी माजी मंत्री आणि आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी मुख्‍यमंत्र्यांकडे केली आहे.

कोवीड-19 चे संकट अधिक गडद होण्‍याची शक्‍यता जागती‍क आरोग्‍य संघटनेने व्‍यक्‍त केली आहे. महाराष्‍ट्र राज्‍य या संकटात अधिक भरडले जात आहे, असं विखे पाटील यांनी म्हटलंय.

मी यासंदर्भात चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही पत्रा द्वारे ही बाब  निदर्शनास आणुन दिली आहे. या मागणीमागे माझा कोणताही पक्षीय अभिनिवेश नाही. एक नागरीक म्‍हणुन ही मागणी आपण करीत असल्‍याचं राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

कोरोना संकटामुळे समाजातील प्रत्‍येक घटक अडचणीत सापडला आहे. शेतकरी, उद्योजक, व्‍यापारी यांच्‍यावरच आर्थिक घडी अवलंबुन असल्‍यामुळे ठप्‍प झालेले जनजीवन पुन्‍हा सुरळीत करण्‍यासाठी सर्वांनाच नवा विश्‍वास द्यायचा असेल तर सर्वांना एक‍जुटीने काम करण्‍याची आवश्‍यकता आहे, असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

महसूल मिळावा म्हणून वाईन शाॅप सुरु करा- राज ठाकरे

लॉकडाऊननंतर रेल्वे सोडा नाहीतर अडकून पडलेले कामगार-मजूर रस्त्यावर येतील- अजित पवार

महत्वाच्या बातम्या-

दिलासादायक! गेल्या 14 दिवसात 78 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी राहीबाई पोपेरे यांचा मोलाचा सल्ला

‘साधूंचे मारेकरी, भाजपचे पदाधिकारी’ म्हणत काॅंग्रेसने ट्विटरवर सादर केला पुरावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More