बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कठीण परिस्थितीत आम्हाला एकटे सोडू नका’; क्रिकेटपटू राशिद खाननं केलं मदतीसाठी आवाहन

नवी दिल्ली | अमेरिकेने अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी घेतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानावर ताबा मिळवला. त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच क्रिकेटपटू राशिद खाननं जगभरातील नेत्यांना अफगाणिस्तानमधील लोकांना वाचवण्यासाठी आवाहन केलं आहे.

माझ्या जगभरातील प्रिय नेत्यांनो माझा देश सध्या संकटात सापडला आहे. दररोज मुलं महिलांसह हजारो लोक मारले जात आहे. देशातील संपत्तीचं प्रचंड नुकसान होत आहे. अनेक घर उद्धवस्त होत आहेत. माणसंही त्यांची घरं सोडून जाण्यासाठी मजबूर झाली आहेत. या कठीण परिस्थितीत आम्हाला एकटं सोडू नका. अफगाणिस्तानमधील लोकांना वाचवा. आम्हाला शांती हवी आहे, असं आवाहन राशिद खानने केलं आहे.

तालिबानच्या हल्लानंतर अफगाणिस्तानमधील काबूल येथील हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळावरचीही परिस्थिती चिघळली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर झाला आहे. राशिद युकेमध्ये द हंड्रेड लीगमध्ये ट्रेंट रॉकेट्स या संघाकडून क्रिकेट खेळत आहे.

दरम्यान, भारतीय दुतावासाने मंगळवारी एक पत्रक जारी केलं आहे. त्या पत्रात अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांनी लवकरात लवकर भारतात येण्याचं नियोजन करावे. तसेच अफगाणिस्तानमधील भारतीय कंपन्यामधील भारतीय नागरिकांना त्वरीत पाठवावं, असा सल्ला देण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

“महाराष्ट्राला सर्वाधिक लसी दिल्या तरी ठाकरे सरकारची तक्रार आहेच”

‘त्यांनी आमचे हात बांधून…’; अफगाणिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचे राष्ट्राध्यक्षांवर गंभीर आरोप

“लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं अवघड करू”

मोठ्या भावाला वाचवण्यासाठी छोट्या भावाची पाण्यात उडी; दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

“फाळणीच्या स्मृती जाग्या ठेवायच्या की या स्मृतींना कायमची तिलांजली द्यायची?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More