“मुंबई से आया मेरा दोस्त…”, राशिद खानची रोहित शर्मासाठी पोस्ट

Rashid Khan | अफगाणिस्तानने बांग्लादेशचा पराभव करत टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 मध्ये स्थान मिळवलं आहे. अफगाणिस्तान संघ हा सेमी फायनलमध्ये पोहोचला आहे. अफगाणिस्तानने डकवर्थ लुईस नियमानुसार बांगलादेश संघाचा 8 धावांनी पराभव केला. तसेच भारताने देखील ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्याने टीम इंडियाचं देखील अफगाणिस्तानने आभार मानले आहेत. एवढंच नाहीतर यावर आता अफगाणिस्तानचा ऑलराऊंडर खेळाडू राशिद खानने (Rashid Khan) रोहित शर्माची सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

नुकत्याच झालेल्या टीम इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया या टी 20 सामन्यात टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला. तसेच रोहित शर्माने वादळी खेळी करत 92 धावा केल्या. ही वादळी खेळी ऑस्ट्रेलिया संघ कधीच विसरणार नाही. अफगाणिस्तान संघ हा सेमीफायनलमध्ये जाण्यामागे टीम इंडिया देखील आहे. रोहितच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलिया संघ 24 धावांनी पराभूत झाला. (Rashid Khan)

भारतामुळे अफगाणिस्तानचा सेमीफायनलमध्ये प्रवेश :

टीम इंडियाने केलेल्या कामगिरीने अफगाणिस्तानचं सेमीफायनलमध्ये येण्याचं स्वप्न साकार झालं असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. ऑस्ट्रेलियाचा पराभव करण्यासाठी अफगाणिस्तानला बांग्लादेश विरूद्ध शेवटच्या शेवटच्या सुपर 8 सामन्यात विजय मिळवायचा होता. तो विजय मिळवण्यात राशिद खानला (Rashid Khan) आणि संघाला यश मिळालं आहे.

अशातच आता राशिद खानने (Rashid Khan) रोहित शर्मासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्याची आता जोरदार चर्चा होताना दिसत आहे. अफगाणिस्तान संघाच्या विजयानंतर राशिद खानने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्याने सोशल मीडियावर रोहित शर्मासोबतचा एक फोटो शेअर केला असून त्याला “बंबई से आया मेरा दोस्त…”, असं कॅप्शन दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashid Khan (@rashid.khan19)

 

अफगाणिस्तान विरूद्ध दक्षिण अफ्रिका सेमीफायनल सामना

यानंतर आता अफगाणिस्तान विरूद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यातील सेमीफायनलचा सामना येत्या 27 जूनला होणार आहे. भारतीय हा सामना 27 जूनला सकाळी 6 वाजेपासून सुरु होणार आहे. हा सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियम खेळवण्यात येणार आहे. अफगाणिस्तान आणि द.अफ्रिका यांच्यातील टी 20 इतिहास पाहिला तर हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात केवळ 2 सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये अफगाणिस्तानचा पराभव झालाय. आता आगामी सामन्यात काय चित्र पाहायला मिळेल याची उत्सुकता लागलेली आहे.

News Title – Rashid Khan Social Media Post About Rohit Sharma

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव; ताबडतोब ‘या’ 5 गोष्टींची काळजी घ्या!

पुण्यात ‘झिका’चे रुग्ण आढळल्याने खळबळ, काय आहेत या आजाराची लक्षणं?

पुण्यात झिका व्हायरसचे 2 रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ

विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी आज मतदान; आता महायुती की महाविकास आघाडी?

पैसे कमवण्याची सुवर्णसंधी! ‘या’ कंपनीचा IPO बाजारात दाखल