बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट म्हणून काम करत होत्या”

मुंबई | परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर ठाकरे सरकार आक्रमक झालं आहे. फोन टॅपिंग प्रकरणावरून राज्यात सध्या खळबळ माजली आहे. राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आव्हाडांनी पुन्हा एकदा ट्विट करत शुक्ला यांच्यावर आरोप केले आहेत.

राजेंद्र यड्रावकर यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी त्यांच्यावर दबाव टाकला. एका पोलिसाला त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी कामाला लावलं, त्यांना अमिष दाखवण्याचाही प्रयत्न झाला होता, असा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

सरकारला दिलदार राहणं महागात पडलं. रश्मी शुक्ला यांनी रडून माझ्या पतीचं आताच निधन झाल आहे असं म्हणून माफी मागितली होती. मग आमच्या सरकारला पाझर फुटला. रश्मी शुक्ला यांनी पाया पडत माफी मागितली आणि त्यांनी दिलेलं लेखी पत्र परत मागितलं बरं झालं सरकारने ते पत्र परत नाही दिलं. आता कळतंय हा कटाचा भाग होता. रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट म्हणून काम करत होत्या, असं म्हणत आव्हाडांनी शुक्लांवर निशाणा साधला.

दरम्यान, मी स्वतः राजेंद्र यड्रावरकरांशी बोललो. त्यांनी मला सगळी परिस्थिती सांगितली. त्यांच्या मागे पोलीस ऑफीसर लावण्यात आला होता. रश्मी शुक्ला यांनी ‘मेरे साथ चाय पिओगे, तो नमक हरामी नही होगी’ असं त्यांना म्हटलं होतं, असं आव्हाड म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

राज्याच्या मुख्य सचिवांचा फोन टॅपिंग प्रकरणावरील अहवाल सादर, रश्मी शुक्लांवर कारवाई होणार???

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

मंत्री असावा तर असा! जितेंद्र आव्हाडांनी घेतला ‘हा’ स्तुत्य निर्णय

…तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही राजीनामा घ्यावा- नाना पटोले

‘रश्मी शुक्ला यांनी भाजपला पाठिंबा देण्यासाठी सांगितलं का?’; यड्रावकरांनी सांगितली अंदर की बात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More