बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘खूपच घाई असेल तर प्रश्न पाठवा उत्तरं देते’; रश्मी शुक्ला यांचं महाराष्ट्र पोलिसांना उत्तर

मुंबई |  पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त आणि राज्याच्या माजी गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी काही दिवसांपुर्वी सरकारी कामकाजाचा डेटा लीक करणे त्याचबरोबर काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. त्यानंतर या प्रकरणात रश्मी शुक्ला यांना महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने समन्स बजावलं होतं. आता याला रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्र पोलिसांना उत्तर दिलं आहे.

सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता रश्मी शुक्ला यांना मुंबईत चौकशीला हजर राहता येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चौकशीची खूपच घाई असेल, तर प्रश्न पाठवून द्या, त्याची उत्तरे देईन, असं रश्मी शुक्ला यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलला सांगितलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलात बदल्या करण्यासाठी अनेक फोन कॉल केले गेले होते, असा आरोप केला होता. त्याचा एक अहवाल त्यांनी वाचून दाखवला होता. तर हे पुरावे त्यांनी केंद्रीय गृहसचिवांकडे दिले होते. हे पुरावे रश्मी शुक्ला यांच्याकडून लीक झाल्याचं समोर आलं होतं. एवढंच नाहीतर रश्मी शुक्ला यांनी दहशतवादी कृत्यासाठी फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. पण, त्यांनी याचा गैरवापर केला असा आरोप देखील त्यांच्यावर आहे.

दरम्यान, रश्मी शुक्ला सध्या हैदराबाद येथे केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक पदावर कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत. पुण्याचं पोलीस आयुक्तपद देखील त्यांनी भुषवलं होतं.

थोडक्यात बातम्या-

ॲास्ट्रेलियन खेळाडूंचा IPL सोडण्याचा निर्णय, मात्र ॲास्ट्रेलियन पंतप्रधांनांनी त्यांना दिला मोठा झटका

मुंब्य्रातील प्राईम हॉस्पिटलला मध्यरात्री भीषण आग; 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू

पीपीई किट घालून ड्रायव्हर वरातीत नाचला; व्हिडीओ तुफान व्हायरल

मोठी बातमी! महाराष्ट्रातील लॉकडाऊनमध्ये 10 दिवसांची वाढ होणार?

परभणीत नाशिक दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली; जिल्हा रुग्णालयात ऑक्‍सिजन गळती

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More