बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दैनिक ‘सामना’च्या पहिल्या महिला संपादक रश्मी ठाकरे

मुंबई | दैनिक सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. या पूर्वी सामनाचे संपादकपद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे होते. मात्र, आता ते मुख्यमंत्री झाल्याने सामनाच्या संपादकपदामुळे काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

सामनाचे कार्यकारी संपादक म्हणून शिवसेना खासदार संजय राऊत काम पाहतात. सामनाचे अग्रलेख राज्यच नव्हे तर देशभरात चर्चेचा विषय ठरत आले आहेत. आता दैनिक सामनाला पहिल्या महिला संपादक मिळाल्या आहेत.

23 जानेवारी 1989 रोजी सामना दैनिकाची सुरुवात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. हिंदुत्वाचा प्रचार करण्यासाठी आणि होणाऱ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी याची सुरुवात करण्यात आली होती. बाळासाहेबांनंतर सामनाचे संपादकपद उद्धव ठाकरे यांच्याकडे आले होते.

उद्धव ठाकरे आता राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे सामनाचे संपादकपद सांभाळताना काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे संपादकपदाची सूत्रं रश्मी ठाकरेंकडे देण्यात आली आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

“मुस्लिमांना आरक्षण देणे ही तर उद्धव ठाकरेंची लाचारी”

इंदोरीकरांच्या वक्तव्याचं किती भांडवल करणार- सिंधुताई सपकाळ

महत्वाच्या बातम्या- 

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्यावर देशद्रोहाची तक्रार दाखल

‘कोरोनो’चा हाहाकार; पाहा आता काय घडलं!

विश्वचषकातील ‘लेडी सेहवाग’ची तुफान फलंदाजी पाहून सचिन म्हणाला…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More