बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंढरपूरची निवडणूक पुन्हा घेण्याच्या मागणीवर मोठा खुलासा, राष्ट्रवादी म्हणते ते पत्र खोटं!

मुंबई | पंढरपूर पोटनिवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात भाजपचे समाधान आवताडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला आहे. परंतु या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या लिगल सेलचं एक पत्र सोशल मीडियावर फिरू लागलं होतं. यात पंढरपूरची पोटनिवडणुक पुन्हा घेण्याची मागणी करण्यात आली होती. आता ते पत्र खोटं असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं आहे.

अॅड. नितिन माने नावाच्या व्यक्तीशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेलचा काहीही संबंध नाही. त्यांना कोणतेही नियुक्तीपत्र देण्यात आलेलं नाही किंवा त्यांनी दिलेल्या कोणत्याही निवेदनाशी अथवा तक्रारीशी सेलचा दूरान्वयानेही संबंध नाही, असं सेलचे प्रदेशाध्यक्ष आशिष देशमुख यांनी जाहीर केलं आहे.

नितीन माने ही व्यक्ती स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेलच्या महाराष्ट्र कार्यकारिणीची सदस्य असल्याचं भासवत जात आहे. या व्यक्तीने तसं लेटरहेड देखील बनवलं आहे. तसेच या लेटरहेडचा वापर करून, पार्टी लिगल सेलच्या नावाचा गैरवापर करून, खोटी निवेदने व तक्रारी ही व्यक्ती देत आहे. नितिन माने यांच्यावर सेलच्या आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वास ठेवू नये व पत्रव्यवहार करू नये, असं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेलचे प्रदेशाध्यक्ष आशिष देशमुख यांनी जाहीर केलं आहे.

दरम्यान,  प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांनी कारखान्यातील सभासद आणि कर्मचाऱ्यांना 3 दिवस डांबून ठेवल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खोट्या पत्रातून केला गेला होता. यावर आता राष्ट्रवादीने स्पष्टीकरण दिलं आहे.

थोडक्यात बातम्या-

लस घेताना पोरीची नाटकं पाहून डॉक्टर जाम भडकले, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

कोरोनाकाळात यशराज फिल्म्सचा मदतीचा हात, ‘या’ 30 हजार लोकांसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय

“लोकशाही संपली असं जाहीर करा नाहीतर चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी”

कोरोनाचे उपचार घेताना ‘हे’ औषध घेतलं तर झपाट्याने पसरेल कोरोना; एम्स संचालकांचा इशारा

…म्हणून कंगणा राणावतला कोसळलं रडू, पाहा व्हिडीओ

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More