बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पंकजा मुंडे माझ्या बहिण, त्यांनी अजून भावाला त्यांचं दु:ख सांगितलं नाही”

औरंगाबाद | ओबीसी आरक्षणाच्या मागणीवरून भारतीय जनता पक्षाने राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं होतं. भाजपसोबत इतर घटक पक्षांनी देखील ओबीसी आरक्षणावरून ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तर पंकजा मुंडे यांनी देखील आक्रमक पवित्रा घेत ओबीसी आरक्षणाची मागणी केली. त्यावर आता राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी भाष्य केलं आहे.

पंकजा मुंडे माझ्या बहिण आहेत. त्यांनी अजून त्यांचं दुखः मला सांगितलं नाही. त्यांनी त्यांचं दुखः सांगितल्यावर ठरवता येईल की, त्यांच्यावर अन्याय झाला की नाही, असं वक्तव्य माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केलं आहे. पंकजा मुंडे यांना सल्ला देण्याइतका मी मोठा झालो नाही, असंही ते म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी ओबीसी समाजाची जनगणना व्हावी, अशी मागणी देखील केली आहे.

ओबीसी समाजाने डिमांडर नव्हे तर कमांडर व्हावे, असं मत जानकरांनी व्यक्त केलं आहे. ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र आणि राज्य सरकारविरूद्ध लोकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. ओबीसी जनगणना झाली नाही तर भाजपसोबत रहायचं की नाही, याचा विचार करावा लागेल, असा इशारा देखील जानकरांनी दिला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी केंद्र सरकारविरूद्ध आंदोलन करू, असंही ते म्हणाले.

दरम्यान, औरंगाबाद महापालिका निवडणूकीत सर्व जागा रासप लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर आता महादेव जानकरांनी पक्षाचा प्रचार करण्यास सुरूवात देखील केली आहे. शहरातील खड्डे पडलेले रस्ते, पाण्याची समस्या आणि इतर आरोग्यविषय मुद्दे जानकर उपस्थित करताना दिसत आहेत.

थोडक्यात बातम्या-

व्हाॅट्सअ‍ॅपचं नवं फिचर; लवकरच ‘या’ नव्या इमोजींचा होणार समावेश

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत होणार ‘या’ मास्कचा उपयोग; संशोधकांचं अनोखं तंत्रज्ञान

मुंबई लोकल सेवा लवकरच सुरू; क्युआर कोडच्या माध्यमातुन प्रवाशांना काढता येणार पास

पीओपी गणेश मुर्तींवर कडक बंदी, चुक कराल तर भराल 10 हजारांचा दंड

मंदिरं उघडण्याचा निर्णय नाहीच?; टास्क फोर्सच्या बैठकीनंतरही कोणती घोषणा नाही!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More