बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जिथे हिंदूंची लोकसंख्या कमी झाली, तिथे..”; मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात हिंदू विचारसरणीवर भाष्य केलं. राजस्थानमधील उदयपूर विद्या निकेतन सेक्टर 4 मध्ये आयोजित कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. त्यावेळी त्यांनी हिंदू समाजाबद्दल मोठ वक्तव्य केलं आहे.

कोरोना काळात संघाच्या स्वयंसेवकांनी केलेली निस्वार्थ सेवा म्हणजे हिंदूत्व होय, अशा कामांमध्ये सर्वांच्या कल्याणाची भावना असते. वेगवेगळ्या कारणांमुळे ज्या ज्या ठिकाणी हिंदूंची लोकसंख्या कमी झाली आहे. त्या ठिकाणी समस्या निर्माण झाल्या आहेत, असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे.

हिंदू हे सनातन संस्कृतीला मानणारे आहेत. सनातन संस्कृतीच्या विचारसरणीमधील संस्कार हे संपुर्ण विश्वाचा विचार करण्याची शिकवण देतात. त्याचबरोबर हिंदुच्या विचारसरणीमध्ये शांती आणि सत्य या दोन गोष्टीचा समावेश आहे. देशात आपण हिंदू नाहीत अशाप्रकाराची एक मोहिम समाजाला कमकुवत बनवण्यासाठी राबवली जात आहे, अशी टीकाही मोहन भागवत यांनी केली आहे.

दरम्यान, हिंदू राष्ट्राच्या परम वैभावामुळे जगाचं कल्याण होईल. संघाचे संस्थापक डॉ हेगडेवार यांची आठवण सांगताना हिंदू समाजाला एकत्र आणल्यास भारताच्या सगळ्या समस्यांवर समाधान मिळू शकतं. त्याचबरोबर हेडगेवार यांनी भारतामधील विविधतेच्या तळातील एकतेचा भाव ओळखलं होतं, असंही मोहन भागवत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

बाबो! ‘या’ शुल्लक कारणामुळे महिलेने हाॅटेल कर्मचाऱ्यांना धो-धो धुतलं; पाहा व्हिडीओ

“देशातील मंदिरे पाडून मस्जिदी बांधल्या, त्या ठिकाणी भाजप पुन्हा मंदिरे बांधणार”

अनंत गीतेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“माझं शरीर एक मंदिर, त्यात मला कुठलंही रसायन टाकायचं नाही”

“किरीट सोमय्यांना आम्ही ओळखत नाही, एखाद्याला काही विशेष माहिती असेल तर…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More