बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवाब मलिकांच्या पत्रकार परिषदेनंतर NCB ‘या’ कारणामुळे न्यायालयात जाणार

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. आता त्यांनी एनसीबीने त्यांच्या जावयावर केलेली कारवाई फर्जी असल्याचं म्हटलं आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी “माझ्या जावयाकडे गांजा सापडलाच नाही. एनसीबीला गांजा आणि तंबाखू यातला फरक कळतो की नाही?” असा सवाल विचारला आहे. आता एनसीबीने एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं समोर आलंय.

पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी समीर खान यांच्यावरील कारवाईबाबत अनेक खुलासे केले होते. यावेळी त्यांनी एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेनंतर आता एनसीबीने एक मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. एनसीबी आता नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना मिळालेल्या जामीनाविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहे.

समीर खान यांना 27 जानेवारीला जामीन मंजूर झाला होता. समीर खान यांना मिळालेल्या या जामीनाला एनसीबी आता मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. माझ्या जावायाकडे गांजा सापडला नसून जावयाकडे सापडलेली हर्बल तंबाखू होती, असं कोर्टाच्या ऑर्डरमध्ये नमूद केलेलं असतानाही एनसीबीने कारवाई केली असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. याशिवाय एनसीबीची कारवाई फर्जी असल्याचंही मलिक यांनी म्हटलं होतं.

एनसीबी ठराविक लोकांची बातमी लीक करून त्यांना बदनाम करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. याप्रकरणी माझ्या जावयाला फ्रेम केलं जातं असून माझा जावई याप्रकरणी उच्च न्यायालयात जाणार आहे, असं मलिक पत्रकार परिषदेत म्हणाले होते. मात्र आता एनसीबीच समीर यांच्या जामिनाविरोधात न्यायालयात जाणार असल्याने समीर खान यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या

“महाराजांच्या घोड्यावर बसून गाढवपणा, या कृत्यानंतर मग बाबरसेना काय करणार?”

कब्बडी खेळताना, नाचताना दिसल्या प्रज्ञा सिंह ठाकूर; सोशल मीडियावर केलं जातंय ट्रोल, पाहा व्हिडीओ

केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा! खाद्य तेलाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“महिला आयोगाला अध्यक्ष मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका”

“पुन्हा आकडेबाजी आणि जुमलेबाजी हा तर केंद्र सरकारचा नेहमीचा खेळ”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More