Top News मनोरंजन

“आज बाळासाहेब असते तर ही घटना घडलीच नसती”

मुंबई | शिवसेना आणि अभिनेत्री कंगणा राणावत यांच्यातील वाद चांगलाच पेटला होता. त्यानंतर मुंबई महापालिकेने कंगणाच्या कार्यालायावर कारवाई केल्यावर शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका झाली होती.

ते प्रकरण कुठे शांत नाही झालं तर कांदिवलीमध्ये शिवसैनिकांनी एका माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली. त्यामुळे शिवसेनेवर अजुनही टीका होत आहे. अशातच अभिनेत्री रतन राजपूतने माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणाचा संताप व्यक्त केला आहे.

लाजिरवाणा, भीतीदायक आणि निराशजनक..  जर आज आपल्यासोबत बाळासाहेब ठाकरे असते तर अशी घटना घडलीच नसती. आम्ही खऱ्या वाघाला मिस करतोय, असं रतन राजपूतने म्हटलं आहे. यासंदर्भात तिने एक पोस्ट केली आहे. रतनची पोस्ट सोशल मीडियावर सर्वांच लक्ष वेधून घेत आहे. तिच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी पाठींबा दिला आहे तर काहींनी म्हटलं आहे की, कंगणाने मुंबई आणि मुंबई पोलिसांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं हे नाही दिसलं वाटतं.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे हात जोडून उभे असल्याचं कार्टून माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी फॉरवर्ड केलं होतं.

 

महत्वाच्या बातम्या-

उदयनराजेंनी पहिल्यांदाच मोदी सरकारच्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करत दिला हा सल्ला

“आरोग्याची हमी मिळत नसेल तर कोणीही जीव धोक्यात घालणार नाही…

“कोरोना तर काहीच नाही अजून 2 मोठी संकटं येणार”

“धनगर आरक्षण न मिळाल्यास सरकारला सळो की पळो करु”

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शंख वाजवण्याचा सल्ला देणाऱ्या भाजप खासदाराला कोरोनाची लागण!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या