मुंबई | कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे मात्र कोरोनाला पळवण्यासाठी आणि त्यावर उपाययोजनांसाठी समाजातले दानशूर देखील पुढे येऊ लागले आहेत. आभाळाएवढं मन असणाऱ्या टाटांनी आत्तापर्यंतची सर्वांत मोठी मदत केली आहे. आधी 500 कोटींची मदत त्यांनी जाहीर केली होती. मात्र आता आणखी 1 हजार कोटींची मदत त्यांनी जाहीर केली आहे. रतन टाटांनी आतापर्यंत दीड हजार कोटींची मदत केली आहे.
कोरोना आजारामुळं सध्याची भारतातील आणि जगाची परिस्थिती ही खूपच वाईट झाली आहे. त्यासाठी आपल्याकडून सर्वात चांगली कृती करण्याची हीच वेळ आहे, असं म्हणत टाटा ग्रुपने आणखी 1 हजार कोटी रूपये मदत म्हणून देत असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
आता काळाची गरज आणि इतर वेळेपेक्षा आपलं योगदान देण्याची हीच वेळ असल्याचं टाटा यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय उपकरणं आणि वैद्यकीय क्षेत्रांतील महत्त्वाच्या खरेदी यांसाठी टाटा ग्रुपकडून ही मदत दिली गेली आहे. काही तासांपूर्वी त्यासाठी रतन टाटांनी 500 कोटी रूपयांची मदत जाहीर केली होती. मात्र आता त्यांनी आणखी 1 हजार कोटींची मदत जाहीर केली आहे.
दरम्यान, साई मंदिराने 50 कोटी रूपये, मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिराने 50 कोटी रूपये तर अंबाबाई मंदिराने देखील 2 कोटी रूपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. दुसरीकडे अनेक स्वयंसेवी आणि सेवाभावी संस्था मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. आपापल्या परीने अनेक संस्था, व्यक्ती कोरोनाच्या लढाईत आपलं योगदान देत आहेत.
Tata Sons announces an additional Rs. 1,000 Crores support towards #COVIDー19 and related activities. https://t.co/TOXo8Hn26I #TataNews #ThisIsTata
— Tata Group (@TataCompanies) March 28, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
‘या’ त्रिसूत्रीनुसार कोरोनावर प्रतिबंध करण्यात येत आहे- आरोग्यमंत्री
गरज पडल्यास संपूर्ण राज्यात “सरकारी कर्फ्यू” जाहीर करावा- मनसे
महत्वाच्या बातम्या-
नरेंद्र मोदींचं आर्थिक मदतीचं आवाहन; एका तासाच्या आत अक्षय कुमारची 25 कोटींची मदत!
आपल्याला कोरोनाला हरवायचंय… आर्थिक मदत करा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
देशसेवेची हीच वेळ… दानशूर रतन टाटांनी केली 500 कोटींची मदत
Comments are closed.