Ratan Tata death | भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालंय. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रविवारी रात्री उशिरा मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर सोमवारी त्यांनी स्वतः ट्विट करत आपल्या प्रकृतीची मीहिती दिली होती. (Ratan Tata death)
“माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरली आहे. पण माझे वय लक्षात घेता आणि सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे काळजी करण्यासारखं कोणतेही कारण नाही”, असं रतन टाटा म्हणाले होते. मात्र, काल 9 ऑक्टोबररोजी त्यांची प्रकृती आणखीनच खालावली. यामुळे त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अयशस्वी ठरली. उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात एक दिवसाचा शासकीय दुखवटा पाळला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली.
रतन टाटा यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन
या काळात राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. तसेच, मनोरंजनाचे आणि करमणुकीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. रतन टाटा यांच्या सन्मानार्थ हा शसकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. आज 10 ऑक्टोबररोजी रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. (Ratan Tata death)
रतन टाटा यांनी देशासाठी दिलेलं योगदान हे खूप मोठं आहे. तसंच रतन टाटा यांच्याविषयी संपूर्ण देशाला वेगळीच आपुलकी होती. देशभक्ती आणि देशहिताचे आदर्श, उद्योग जगतातले पितामह अशी रतन टाटांची ओळख होती. सर्वात मोठा व्यवसाय समूह असलेल्या टाटा या समूहाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. टाटा समूहाची स्थापना जमशेदजी टाटा यांनी केली होती. त्यांच्या कुटुंबातील अनेक पिढ्यांनी या समूहाचा विस्तार केला.
महाराष्ट्रात 1 दिवसाचा दुखवटा जाहीर
जगातील सर्वात लहान कार नॅनो तयार केल्याने रतन टाटा जगभरात प्रसिद्ध झाले. रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. त्यांचं नाव भारताच्या उद्योग क्षेत्रात अभिमानाने घेतलं जातं. कोरोना काळात देशावर मोठं संकट कोसळलं असताना टाटा यांनी आपल्या हॉटेल्स राज्य सरकारला रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी मोफत दिल्या होत्या. रतन टाटा यांचा सामाजिक कार्यात मोठा हातभार आहे. (Ratan Tata death)
रतन टाटा यांना 2000 मघ्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना 2006 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या सर्वोष्ठ मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. त्यानंतर रतन टाटा यांना केंद्र सरकारकडून 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने देखील गौरविण्यात आलं होतं. टाटा यांना 2014 मध्ये ऑनररी नाइट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरने गौरविण्यात आलं होतं. अशा अनेक पुरस्कारांनी रतन टाटा यांना देशात आणि विदेशात सन्मानित करण्यात आलं होतं.
News Title : Ratan Tata death day of mourning declared in Maharashtra
महत्वाच्या बातम्या –
जरांगेंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या डॉक्टरवर शाईफेक!
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! तब्बल ‘इतके’ वर्ष मोफत धान्य मिळणार
आता तुम्ही सगळे पडणार, मनोज जरांगेंच खळबळजनक वक्तव्य
आज रंगणार भारत विरुद्ध बांगलादेश; कुठे व किती वाजता पाहता येणार
शनीचा राहुच्या नक्षत्रात प्रवेश, ‘या’ 3 राशींच्या आर्थिक अडचणी वाढणार!