महाराष्ट्र मुंबई

रतन टाटांना वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी दंड; चौकशीत समोर आला धक्कादायक प्रकार!

मुंबई | प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या कारच्या नंबर प्लेटचा वापर दुसराच कोणीतरी करत होता. मात्र याची माहिती टाटा यांना नव्हती.

वेळी वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी टाटा यांना वाहतूक पोलीस शाखेकडून ई चलन पाठवण्यात आलं. त्यावेळी टाटा यांनाही आश्चर्य वाटलं. नियम न मोडता ई चलन आलं कसं, याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी त्यांनी वाहतूक शाखेकडे तक्रार केली. त्यावेळी धक्कादायक माहिती पुढे आली.

सिग्नल तोडल्यामुळे रतन टाटा यांच्याकडे ई चलन पोहोचल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. यानंतर रतन टाटा यांच्या गाडीचा नंबर एक महिला आपल्या कारवर लावून चालवत असल्याचं समोर आलंय.

आपल्याला एका ज्योतिषीने विशेष नंबरची प्लेट वापरण्याचा सल्लाल दिला. या ज्योतिषाच्या सांगण्यावरून महिलेने रतन टाटा यांच्या गाडीचा नंबर वापरला, अशी माहिती समोर आली आहे.

थोडक्यात बातम्या-

राष्ट्रगीत सुरु असताना भारताचा ‘हा’ खेळाडू भावुक; सिडनीच्या मैदानावर अश्रू अनावर!

‘पोलीस भरती तात्काळ रद्द करा, अन्यथा…’; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा सरकारला इशारा

राहुल गांधी हे फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतील- संजय राऊत

अभिनेता सोनू सूदविरोधात मुंबई महापालिकेची पोलिसांत तक्रार; पाहा काय आहे प्रकरण…

मुंबई उच्च न्यायालयाचा श्रीपाद छिंदमला दणका!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या