महाराष्ट्र मुंबई

नम्रता हा व्यवसाय वाढीचा मूलमंत्र आहे- रतन टाटा

मुंबई | नवोन्मेष आणि सृजनशीलता हे उद्योगजगताचे आधारस्तंभ असले तरी, उद्योजकांना देशाच्या बदलत्या गरजांशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने वेळोवेळी योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे, असं उद्योगपती रतन टाटा यांनी म्हटलंय.

टेकस्पार्क्‍स 2020 कार्यक्रमात काळानुरूप विकसनशील देशांतील बदलत्या गरजा या विषयावर रतन टाटा यांनी उद्योजकांना मार्गदर्शन केलं. यावेळी ते बोलत होते.

नम्रता हा व्यवसाय वाढीचा मूलमंत्र आहे. केवळ मूल्यनिर्मितीसाठीच नव्हे, तर मानव कल्याणासाठी आपण कोणत्या प्रकारे योगदान देऊ शकतो, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे, असं रतन टाटा म्हणाले.

दरम्यान, अवकाशयुगीन आणि अन्य प्रगत तंत्रज्ञानाचा व्यवसाय वाढीसाठी वापर केला पाहिजे, असंही रतन टाटा यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“निवडणूक आयोग ही भाजपचीच शाखा, त्यांच्याकडून अधिक अपेक्षा करु नये”

“महाविकास आघाडीने फेव्हीकॉल तयार केलाय, चिकटवून ठेवलं तर काही केल्या तुटत नाही”

“तुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल”

“मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही”

“पराभव दिसू लागला की भाजप पाकिस्तानच्या आश्रयाला जातं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या