Ratan Tata | प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. या वृत्तामुळे देशभर शोककळा पसरली आहे. मुंबईत आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य अशा अनेक क्षेत्रात रतन टाटा यांचे मोठे योगदान आहे. मात्र, त्यांनी कधीच लग्न केलं नाही. त्यांनी संपूर्ण आयुष्य सिंगल व्यतीत केलं. त्यांचं लग्न न होण्यामागे देखील एक रंजक कथा आहे. या लेखात त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही गोष्टी सांगण्यात आल्यात. (Ratan Tata )
एका मुलाखतीमध्ये स्वतः रतन टाटा यांनी त्यांची प्रेम कथा सांगितली होती. ते म्हणाले होते, जेव्हा ते अमेरिकेत काम करत होते तेव्हा ते तेथील एका मुलीच्या प्रेमात पडले होते. मात्र, त्याचवेळी त्यांच्या आजींची प्रकृती बिघडली. त्यांची आजी भारतात होती आणि त्यांना रतन टाटा यांना भेटायचे होते. त्यामुळे रतन टाटा यांना भारतात परतावे लागले.
रतन टाटा यांनी लग्न का केलं नाही?
या दरम्यान रतन टाटा यांची प्रेयसी देखील भारतात येणार होती आणि त्यानंतर दोघेही लग्न करणार होते. मात्र, नशिबाने त्यांच्या आयुष्यात काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. त्या काळात भारत आणि चीन यांच्यात वाद सुरू होता. त्यामुळे त्यांची प्रेयसी भारतात आलीच नाही. काही काळानंतर तिने अमेरिकेतील एका व्यक्तीसोबत लग्न केले. यानंतर रतन टाटा यांनी मात्र, कायमच सिंगल राहण्याचा निर्णय घेतला.
एकदा बडोदा येथे एका कार्यक्रमात बोलताना रतन टाटा म्हणाले होते की, मी आयुष्यात चार वेळा प्रेमात पडलो, पण मी अजूनही सिंगलच आहे. प्रत्येक वेळी कोणत्या तरी कारणाने लग्न करता आले नाही. आणखी एका कार्यक्रमामध्ये देखील रतन टाटा यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चा केली होती. ‘कधी कधी मला आयुष्यात एकटं वाटतं आणि वाटतं की, कोणाची तरी सोबत पाहिजे होती.’ पण नंतर त्यांनी सांगितले की, ते सिंगल आहेत, हे एक प्रकारे चांगले आहे कारण त्यांना कोणाची चिंता करण्याची गरज नाही. (Ratan Tata )
रतन टाटा एक दिलदार व्यक्तीमत्व
दरम्यान, रतन टाटा नेहमीच आपल्या औदार्य आणि साध्या स्वभावासाठी ओळखले जात असे. श्वानांशी त्यांचे असलेले विशेष प्रेम नेहमीच दिसून आले आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी कुत्र्यांसाठी एक अत्याधुनिक हॉस्पिटल उघडले. नवी मुंबईतील या 5 मजली हॉस्पिटलमध्ये 200 पाळीव प्राण्यांचा एकाच वेळी उपचार केला जाऊ शकतो. हे रुग्णालय तयार करण्यासाठी तब्बल 165 कोटी रुपये खर्च केल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या या दिलदार स्वभावामुळे ते देशभरातील नागरिकांचे आवडते उद्योगपती होते.
त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, उद्योग अशा अनेक क्षेत्रांसाठी मोठे योगदान दिले आहे. रतन टाटांना टाटा सन्समधून जेवढे उत्पन्न मिळायचे त्याच्या 66% भाग ते चॅरिटेबल ट्रस्टला द्यायचे. हा पैसा शिक्षण आणि आरोग्य सेवेसह अन्य लोकोपयोगी कामांसाठी वापरला जातो. त्यांनी आरोग्यसेवा, शिक्षण, ग्रामीण विकास आणि सामाजिक कल्याण आदींसाठी जवळपास 9,000 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या देणग्या दिलेल्या आहेत. त्यांच्या निधनाने आता सर्वत्र शोक व्यक्त केला जातोय. सोशल मीडियावर अनेक दिग्गजांनी दुःख व्यक्त केलं आहे. त्यामुळे सध्या फक्त आणि फक्त रतन टाटा यांचीच चर्चा आहे. (Ratan Tata )
News Title : Ratan Tata love story
महत्वाच्या बातम्या –
रतन टाटा यांची एकूण संपत्ती किती?, उत्पन्नातील मोठा हिस्सा दानमध्येच दिला
सर रतन टाटा यांचे 10 प्रेरणादायी विचार, एकदा वाचाच!
..आता रतन टाटांच्या टाटा समूहाचा उत्तराधिकारी कोण असणार?
भारताचा अनमोल ‘रतन’ हरपला! टाटा यांची कारकीर्द पाहून सलाम ठोकाल
भारताचा कोहिनूर हरपला!रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर