Ratan Tata | देशातील एक सुप्रसिद्ध उद्योगपती म्हणूनच नाही तर एक महान व्यक्तिमत्व म्हणून सर रतन टाटा यांना ओळखले जाई. त्यांनी 9 ऑक्टोबररोजी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. या महान व्यक्तीमत्वाच्या निधनाच्या वृत्ताने देशभर शोक व्यक्त करण्यात येत आहे. आज सोशल मीडियावर फक्त आणि फक्त रतन टाटा यांची चर्चा आहे. देशभरातील नागरिक त्यांचा प्रचंड आदर करतात. हा आदर, प्रेम, जिव्हाळा रतन टाटा यांनी आपल्या स्वभावामुळे आणि उच्च विचारांमुळे कमावला आहे. त्यांचे काही प्रेरणादायी विचार या लेखात दिले आहेत, जे प्रत्येक व्यक्तीला एक नवीन ऊर्जा प्रदान करतात. जीवनात आलेल्या अनेक अडचणींचा सामना करण्यासाठी रतन टाटा यांचे हे विचार उपयोगी पडू शकतात. (Ratan Tata)
रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार
- तुमची चूक तुमची एकट्याची आहे, तुमचे अपयश एकट्याचे आहे, त्यासाठी कोणाला दोष देऊ नका. आपल्या चुकांमधून शिका आणि आयुष्यात पुढे जा.
- मनुष्याचे जीवन हे चढ-उतारांनी भरलेले आहे, त्याची सवय करा.
- टीव्हीचे आयुष्य खरे नाही आणि टीव्ही मालिकेसारखे आयुष्यही नाही. वास्तविक जीवनात विश्रांती नाही, फक्त काम आहे.
- जे लोक इतरांची कॉपी करतात ते थोड्या काळासाठी यश मिळवू शकतात, परंतु ते आयुष्यात जास्त प्रगती करू शकत नाहीत.
- सांत्वनाची बक्षिसे फक्त शाळेतच दिसतात. काही शाळा तुम्हाला उत्तीर्ण होईपर्यंत परीक्षा देऊ देतात. पण बाहेरच्या जगाचे नियम वेगळे आहेत, तिथे हरणाऱ्याला दुसरी संधी मिळत नाही.
- लोखंडाला कोणी नष्ट करु शकत नाही. परंतु गंज लागल्यास लोखंड नष्ट होऊ शकतं. त्याचप्रमाणे कोणीही व्यक्तीला नष्ट करु शकत नाही. पण माणूस त्याच्या मानसिकतेमुळे नष्ट होऊ शकतो. (Ratan Tata)
- माझा योग्य निर्णय घेण्यावर विश्वास नाही. तर, मी निर्णय घेतो आणि त्यानंतर त्याला योग्य ठरवतो.
- जीवनात चढ-उतार हे पुढे जाण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. कारण ईसीजीमध्ये सरळ रेषा येते, त्याचा अर्थ आपण जिवंत नाही असा होतो.
- गोष्टी नशिबावर सोडायच्या यावर माझा विश्वास नाही. कठोर मेहनत आणि तयारीवर माझा विश्वास आहे.
- आपलं मूळ कधी विसरु नका. जिथून तुम्ही आलात, नेहमी त्याचा अभिमान बाळगा
- तुम्हाला एक लढाई जिंकण्यासाठी एकापेक्षा जास्तवेळ लढावं लागू शकतं.
- जर लोकांनी तुमच्यावर दगडफेक केली तर त्या दगडांचा वापर तुमचा महाल बांधण्यासाठी करा. (Ratan Tata)
News Title : Ratan Tata Motivational Quotes
महत्वाच्या बातम्या –
..आता रतन टाटांच्या टाटा समूहाचा उत्तराधिकारी कोण असणार?
भारताचा अनमोल ‘रतन’ हरपला! टाटा यांची कारकीर्द पाहून सलाम ठोकाल
भारताचा कोहिनूर हरपला!रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर
जरांगेंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या डॉक्टरवर शाईफेक!
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! तब्बल ‘इतके’ वर्ष मोफत धान्य मिळणार