Ratan Tata Networth | प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची संपत्ती ही एकूण 3800 कोटी रुपये आहे. यामध्ये टाटा ग्रुप, टाटा सन्समधून त्यांना सर्वाधिक उत्पन्न मिळालेले आहे. रतन टाटा हे दानशूर होतेच, यामुळे त्यांच्या उत्पन्नातील मोठा हिस्सा ते दान करायचे. रतन टाटा यांचे नाव श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिले दिसून येत नाही. कारण, टाटा सन्स या होल्डिंग कंपनीच्या अंतर्गत टाटा ट्रस्ट्स, संस्थांनी केलेल्या एकूण कमाईपैकी 66 टक्के धर्मादाय कार्यांसाठी योगदान देते. (Ratan Tata Networth)
रतन टाटांना टाटा सन्समधून जेवढे उत्पन्न मिळायचे त्याच्या 66% भाग ते चॅरिटेबल ट्रस्टला द्यायचे. हा पैसा शिक्षण आणि आरोग्य सेवेसह अन्य लोकोपयोगी कामांसाठी वापरला जातो. याचबरोबर रतन टाटा यांनी अनेक स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. ओला आणि पेटीएम सारख्या प्रसिद्ध कंपन्यांचा यात समावेश आहे.यामुळे तरुण उद्योजकांना पाठिंबा मिळत होता.
रतन टाटा यांची एकूण संपत्ती
काही मीडिया रिपोर्टनुसार, रतन टाटा यांच्याकडे कारचे देखील आलिशान कलेक्शन आहेत. टाटा नॅनोपासून ते मर्सिडीज, कॅडिलॅक आदी कार त्यांच्याकडे आहेत. टाटा नेक्सॉन, मर्सिडीज-बेंझ एसएल 500, लँड रोव्हर फ्रीलँडर, मसराटी क्वाट्रोपोर्टे, कॅडिलॅक एक्सएलआर, शेवरलेट कार्वेट, होंडा सिविक या कार त्यांच्याकडे आहेत. (Ratan Tata Networth)
रतन टाटा यांनी सामाजिक कार्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी आरोग्यसेवा, शिक्षण, ग्रामीण विकास आणि सामाजिक कल्याण आदींसाठी जवळपास 9,000 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या देणग्या दिलेल्या आहेत. यामध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलला $50 दशलक्ष, कॉर्नेल विद्यापीठात भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी $28 दशलक्ष, कार्नेगी मेलॉन विद्यापीठाला $35 दशलक्ष दान केलेले आहेत.
इतकी प्रचंड कमाई असताना देखील रतन टाटा यांची राहणीमान अत्यंत साधी आणि सरळ होती. यामुळे ते सामान्य जनतेमध्ये देखील प्रसिद्ध होते. त्यांच्या विचारांनी त्यांना एका वेगळ्या उंचीवर नेले. रतन टाटा यांचा साधेपणा नेहमीच भावणारा असायचा. याचे अनेक किस्से देखील प्रचलित आहे. ते एक श्वानप्रेमी देखील होते. त्यांच्या निधनाने देशभर शोक व्यक्त केला जातोय. आज 10 ऑक्टोबररोजी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. (Ratan Tata Networth)
News Title : Ratan Tata Networth
महत्वाच्या बातम्या –
सर रतन टाटा यांचे 10 प्रेरणादायी विचार, एकदा वाचाच!
..आता रतन टाटांच्या टाटा समूहाचा उत्तराधिकारी कोण असणार?
भारताचा अनमोल ‘रतन’ हरपला! टाटा यांची कारकीर्द पाहून सलाम ठोकाल
भारताचा कोहिनूर हरपला!रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर
जरांगेंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या डॉक्टरवर शाईफेक!