Ratan Tata Passed Away | भारतीय उद्योग जगताचा पितामह असलेल्या रतन टाटा यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या निधनाने देशभर शोककळा पसरली आहे. संपूर्ण देशभरात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. देशातील जनतेला त्यांच्याबद्दल एक वेगळीच आपुलकी होती. देशभक्ती व देशहिताचं आदर्श उदाहरण म्हणून रतन टाटा यांच्याकडे पहिलं जात होतं. देशातील सर्वात मोठ्या व्यावसायिक समूहापैकी एक म्हणून ओळख असणाऱ्या टाटा समूहाचे ते अध्यक्ष होते. ज्याची स्थापना जमशेटजी टाटा यांनी केली होती. (Ratan Tata Passed Away)
त्यांच्या कुटुंबातील अनेक पिढ्यांनी या समूहाचा विस्तार केला. जगातील सर्वात लहान कार नॅनो तयार केल्याने रतन टाटा जगभरात प्रसिद्ध झाले. रतन टाटा यांचे नाव सामाजिक कार्यात अग्रेसर होते. त्यांनी देशासाठी आणि समाजासाठी केलेले कार्य खूप मोठे आहे. देशातील आवडत्या उद्योगपतीपैकी रतन टाटा एक होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण देशभर हळहळ व्यक्त केली जातेय.
रतन टाटा यांची कारकीर्द
रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा आणि आईचे नाव सनी टाटा होते. 10 वर्षांचे असताना रतन टाटा यांना दत्तक घेण्यात आले. त्यांचं नाव भारताच्या उद्योग क्षेत्रात अभिमानाने घेतलं जातं. रतन टाटा ( Ratan Tata ) 1961 च्या दरम्यान टाटा स्टील कंपनीत सामान्य कर्मचारी म्हणून रुजू झाले. 1991 मध्ये त्यांना टाटा ग्रुपच्या चेअरमनपदी, जेआरडी टाटांनी पद सोपवलं. रतन टाटांकडे टाटा समूहाचं चेअरमनपद आल्यानंतर समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटांनी स्वतःची हिस्सेदारी वाढवली. 1998 मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची ‘इंडिका’ कार टाटा मोटर्सने बनवली अशा पद्धतीची कार तयार करणं हे रतन टाटांचं स्वप्न होतं. (Ratan Tata Passed Away)
यानंतर एका कुटुंबाला मोटारसायकलवर प्रवास करताना पाहून स्वस्तात कार बनवण्याची कल्पना त्यांना सुचली. 2008 मध्ये रतन टाटांच्या मार्गदर्शनात टाटा मोटर्सने टाटा नॅनो कार मार्केटमध्ये आणली. पुढे 2012 मध्ये त्यांनी टाटा समूहाच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला आणि सायरस मिस्त्री यांच्याकडे पदभार दिला. 2016 मध्ये या दोघांत वाद झाल्याने पुन्हा एकदा टाटा चेअरमन झाले. नटराजन चंद्रशेखर सध्या टाटा समूहाचे चेअरमन आहेत. रतन टाटा यांच्या पश्चात धाकटे भाऊ जिम्मी टाटा, नोएल टाटा हे दोन भाऊ आहेत.
रतन टाटा यांनी भारत देशासाठी अनेक योगदान दिलं आहे. कोरोना काळात देशावर मोठं संकट कोसळलं असताना टाटा यांनी आपल्या हॉटेल्स राज्य सरकारला रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी मोफत दिलं होतं. रतन टाटा यांचा सामाजिक कार्यात मोठा हातभार आहे. (Ratan Tata death)
रतन टाटा यांना मिळालेले पुरस्कार
रतन टाटा यांना 2000 मघ्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना 2006 मध्ये महाराष्ट्र सरकारच्या सर्वोष्ठ मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. त्यानंतर रतन टाटा यांना केंद्र सरकारकडून 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने देखील गौरविण्यात आलं होतं. टाटा यांना 2014 मध्ये ऑनररी नाइट ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायरने गौरविण्यात आलं होतं. अशा अनेक पुरस्कारांनी रतन टाटा यांना देशात आणि विदेशात सन्मानित करण्यात आलं होतं. (Ratan Tata Passed Away)
News Title : Ratan Tata Passed Away
महत्वाच्या बातम्या –
भारताचा कोहिनूर हरपला!रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर
जरांगेंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या डॉक्टरवर शाईफेक!
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! तब्बल ‘इतके’ वर्ष मोफत धान्य मिळणार
आता तुम्ही सगळे पडणार, मनोज जरांगेंच खळबळजनक वक्तव्य
आज रंगणार भारत विरुद्ध बांगलादेश; कुठे व किती वाजता पाहता येणार