बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशासाठी कायपण! ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रतन टाटांनी उचललं आणखी एक महत्त्वाचं पाऊल

नवी दिल्ली | कोरोना फार मोठ्या प्रमाणात फोफावत चालला आहे. कोरोनारूग्णांची संख्याही वाढत असून ऑक्सिजनची कमी जाणवत आहे. वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर टाटा उद्योग समुहाने 200-300 टन ऑक्सिजन पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल केेलेल्या आव्हानानंतर टाटांनी आणखी एक निर्णय घेतला आहे.

टाटा ग्रुपने मोठ्या आकाराचे 24 ऑक्सिजन वाहक सिलेंडर्स आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत टाटा ग्रुपने ट्विट करत माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व नागरिकांना केलेलं आवाहन कौतुकास्पद आहे. आम्ही टाटा कंपनीकडून भारतातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी जे प्रयत्न शक्य आहेत ते सर्व करण्यास कटीबद्ध आहोत. ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी आम्ही असाच एक निर्णय घेतला आहे, असं टाटा ग्रुपने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन अत्यंत महत्वाचा आहे. देशात निर्माण झालेली गरज लक्षात घेता आम्ही रोज अनेक राज्यं आणि रुग्णालयांना 200 ते 300 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करत आहोत. या लढाईत आम्हीदेखील आहोत आणि नक्कीच आपण जिंकू, असं ट्विट करत टाटा स्टीलने याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे बेडची कमतरता आहे तर ऑक्सिजनही मिळताना दिसत नाही. आव वासून उभा असलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. मात्र रेमडेसिवीर तसंच ऑक्सिजनचा तुटवड्यामुळे अनेक राज्य केंद्राकडे मदत मागत आहेत.

 

थोडक्यात बातम्या-

“उंटाच्या तोंडाचा मुका घ्यायची धडपड करू नका, आम्ही चंपा बोललो तर तुमचं मानसिक संतुल ढासळतं”

नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती; 22 जणांचा मृत्यू

‘हा कठीण काळ आहे’; मालदीवमध्ये एन्जॉय करणाऱ्या सेलिब्रिटींवर श्रुती हासन भडकली

राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांसाठी ‘सीरम’ने जाहीर केल्या कोविशिल्ड लसीच्या किंमती

महेंद्र सिंह धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More