Top News महाराष्ट्र मुंबई

बापमाणूस! आजारी कर्मचाऱ्याला पाहण्यासाठी 83 वर्षाचे टाटा मुंबईहून पुण्याला

मुंबई | टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा आपल्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नेहमीच चांगल्या उपायोजना करतात. लॉकडाऊनच्या काळात केंद्राला 1500 कोटींची मदत करणाऱ्या टाटांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार कमी नव्हते केले आणि दिवाळीचा बोनसही दिला होता. त्यामुळे टाटांविषयी सर्वांना आदर आहे.

अशातच एका ट्विटर युझरने टाटांविषयी पोस्ट केली आहे. त्यामध्ये मुंबईहून पुण्याला आपल्या माजी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी गेले असल्याचं म्हटलं आहे.

टाटा समुहात काम करणारा माजी कर्मचारी गेले दोन वर्ष आजारी असल्याने टाटांनी त्यांची भेट घेत तब्येतिची विचारपूस केली आहे. संबंधित आजारी कर्मचारी आणि टाटांच्या भेटीचा फोटो तेथील सोसायटीतील एकाने ट्विटरला पोस्ट केला आहे.

दरम्यान, रतन टाटांचा हा फोटो सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 83 वर्षाच्या टाटांनी घेतलेल्या या भेटीमुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

थोडक्यात बातम्या-

नवीन कोरोनाचे रुग्ण आढळल्याने अधिक दक्षता घ्या- उद्धव ठाकरे

कौतुकास्पद! गोशाळेत काम करत शेतकरी कन्येने केला अभ्यास आता बनणार न्यायाधीश

थोरातांची परवानगी घेत काँग्रेसकडून लढताना वाचलेला निधी उर्मिलांनी CM फंडात दिला!

लोकसभा अध्यक्षांची लेक बनली आयएएस, पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश!

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कोव्हिशील्ड लसीच्या निर्यातीवर बंदी

टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळे तिसऱ्या खेळाडूची कसोटी मालिकेतून माघार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या