रतन टाटांच्या ‘त्या’ तरुणाची टाटा मोटर्समध्ये मोठी झेप; शंतनू नायडू बनला जनरल मॅनेजर!

Shantanu Naidu l उद्योगपती रतन टाटा यांच्याशी जवळीक साधलेल्या शंतनू नायडू या तरुणाबद्दल तुम्हाला आठवत असेलच. शंतनू नेमका कोण, तो काय करतो, रतन टाटांनी त्याच्या ‘Goodfellows’ या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक का केली असे अनेक प्रश्न त्यावेळी अनेकांना पडले होते. आता याच शंतनूने टाटा मोटर्समध्ये मोठी झेप घेतली असून तो जनरल मॅनेजरपदी रुजू झाला आहे. शंतनूने लिंक्डइनवर एक भावनिक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.

शंतनू नायडू बनला जनरल मॅनेजर! :

काही दिवसांपूर्वी रतन टाटांचे निधन झाले. त्यांनी बनवलेल्या मृत्युपत्रानुसार, शंतनूचे शिक्षणासाठी घेतलेले कर्ज माफ करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर, वृद्धांना आधार देण्यासाठी शंतनूने सुरु केलेल्या ‘Goodfellows’ या स्टार्टअपसाठी रतन टाटांनी गुंतवलेले पैसे आणि शंतनूच्या नावे एक मोठी रक्कमही त्याच्याकडेच सोडण्यात आली होती.

आता शंतनू टाटा मोटर्समध्ये ‘जनरल मॅनेजर – स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्ह’ या पदावर रुजू झाला आहे. “मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा माझे वडील पांढरा शर्ट आणि निळी पँट घालून टाटा मोटर्समधून घरी यायचे. मी खिडकीत उभा राहून त्यांची आतुरतेने वाट पाहायचो. आज आयुष्याचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे,” अशा शब्दांत शंतनूने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शंतनूने २०१४ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि २०१६ मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून एमबीए पूर्ण केले. २०१८ मध्ये तो रतन टाटांचा सहाय्यक म्हणून रुजू झाला आणि त्यांच्याशी जवळीक निर्माण झाली. ९ ऑक्टोबर २०२२ रोजी रतन टाटांचे निधन झाले. रतन टाटा आणि शंतनू नायडू यांच्यातील अनोखी मैत्री सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांच्या या घट्ट मैत्रीचाच एक भाग म्हणून रतन टाटांनी आपल्या मृत्युपत्रात शंतनूच्या नावे मोठा हिस्सा ठेवला होता.

News Title : ratan-tata-young-friend-shantanu-naidu-appointed-as-general-manager-at-tata-motors